बापरे! बेहिशोबी मालमत्तेचा तपास करण्यासाठी पोहचली EOW ची टीम; पाहताच क्लार्क प्यायला फिनाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:37 PM2022-08-03T15:37:48+5:302022-08-03T15:44:11+5:30
मालमत्तेचा तपास करण्यासाठी EOW ची टीम पोहचली आणि त्यांना पाहताच क्लार्कने चक्क फिनाईल प्यायल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि जबलपूरमध्ये EOW (इकोनॉमिक ऑफेंस विंग) ची छापेमारी सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बेहिशोबी मालमत्तेचा तपास करण्यासाठी EOW ची टीम पोहचली आणि त्यांना पाहताच क्लार्कने चक्क फिनाईल प्यायल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बैरागडमधील शासकीय कर्मचारी असलेल्या हीरो केसवानीच्या घरी EOW विभागाची टीम पोहोचली.
घटनास्थळी पोहोचताच त्यांनी कुटुंबातील सदस्यांना बाहेर जाण्यापासून रोखलं आणि कागदपत्र आपल्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला. याच दरम्यान हीरो केसवानी फिनाईल प्यायला. ज्यानंतर त्याची तब्येत बिघडली. उपचारासाठी त्याला तातडीने हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
छापेमारी दरम्यान कर्मचाऱ्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी पाच-सहाच्या दरम्यान EOW ची टीम हीरो केसवानीच्या घरी दाखल झाली. ईओडब्ल्यूला अनेक दिवसांपासून केसवानीच्या विरोधात अनेक तक्रारी मिळत होत्या. त्याच्या भ्रष्टाचाराची माहिती मिळत होती. यानंतर टीमने त्याच्या घरी छापेमारी केली आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.