नोएडामध्ये एस्कॉर्ट सर्व्हिसचा पर्दाफाश; 2 कॉलगर्लसोबत हॉटेलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:55 PM2021-08-11T17:55:40+5:302021-08-11T17:56:31+5:30

escort service in Noida exposed: पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून 5300 रुपये रोख, 3 मोबाईल फोन व अन्य आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या तरुणी या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या आजुबाजुला असलेल्या हॉटेलांमधील ग्राहकांकडे पाठविल्या जात होत्या.

escort service in Noida exposed; Caught a government employee in a hotel with 2 callgirls | नोएडामध्ये एस्कॉर्ट सर्व्हिसचा पर्दाफाश; 2 कॉलगर्लसोबत हॉटेलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला पकडले

नोएडामध्ये एस्कॉर्ट सर्व्हिसचा पर्दाफाश; 2 कॉलगर्लसोबत हॉटेलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला पकडले

Next

नोएडा : नोएडाच्या सेक्टर 20 कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भांडाफोड केला. एका हॉटेलमधून दोन कॉलगर्लसोबत (Call girl) एका सरकारी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. (Police Raid on Escort ervice in Noida.)

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून 5300 रुपये रोख, 3 मोबाईल फोन व अन्य आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या तरुणी या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या आजुबाजुला असलेल्या हॉटेलांमधील ग्राहकांकडे पाठविल्या जात होत्या. आता पोलीस या रॅकेटमध्ये सहभागी अन्य लोकांचा शोध घेत आहेत. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 15 मधील क्यूआरडीस हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी लगेचच त्या ठिकाणी छापा टाकला. हॉटेलच्या खोलीतून एक तरुण आणि दोन महिला आपत्तीजनक परिस्थितीत आढळून आल्या. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो अलीगढचा रहिवासी सत्येंद्र सिंह आहे. 

पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी सांगितले की, छाप्यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. सत्येंद्र सिंह हा अलीगढमध्ये पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहे. या दोन्ही तरुणींना एस्कॉर्ट सर्व्हिसद्वारे बोलविण्यात आले होते. काही हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरु होता. तपास सुरु आहे. 

Web Title: escort service in Noida exposed; Caught a government employee in a hotel with 2 callgirls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.