ईएसआयसी उपसंचालकाने घेतली 50 हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:53 AM2021-01-31T05:53:11+5:302021-01-31T05:53:40+5:30
Bribe News : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने गजाआड केले.
नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने गजाआड केले. तक्रारदाराला लावण्यात आलेला २३ लाख रुपयांचा दंड कमी करण्याच्या बदल्यात त्याने ही लाच घेतली.
खासगी सुरक्षा कंपनीचा मालक व कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कागदपत्रात घोळ असल्याच्या आरोपावरून ईएसआयसीने त्यांना नोटीस पाठविली होती.
याबाबत माहिती देताना सीबीआय प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले की, कारवाईबाबत माहिती मिळताच तक्रारदार व कंपनीचा मालक हे दोघेही उपसंचालकांना भेटण्यासाठी ईएसआयसी कार्यालयात गेले. तेथे उपसंचालकाने कागदपत्रांत घोळ असल्याचे सांगितले व २३ लाख रुपयांचा दंड लावणार आहोत, असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर सीबीआयने सापळा रचला व आरोपीला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीच्या चंडीगड, मोहाली व जम्मूतील परिसरांची झडती घेण्यात आली. यात सात लाख रुपये नकदी व मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
कागदपत्रे जप्त
या सर्व प्रकारानंतर सीबीआयने सापळा रचला व आरोपीला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीच्या चंडीगड, मोहाली व जम्मूतील परिसरांची झडती घेण्यात आली. यात सात लाख रुपये नकदी व मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.