संतापजनक! "भाजपाच्या नेत्यांनी थोबाडात मारली, बॉम्बही आणले"; पोलीस अधिकाऱ्याचा 'तो' Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 08:35 AM2021-07-11T08:35:58+5:302021-07-11T08:40:16+5:30
Crime News : पोलिसांना मारहाण केल्याचा हा व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावण्यात आली आहे. हतबल होऊन अधिकाऱ्याला आपल्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करावी लागली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात संबंधित अधिकारी भाजपाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांवर आपल्याला थोबाडीत मारण्याचा आणि हिंसा भडकवण्यासाठी बॉम्ब आणल्याचा आरोप करताना दिसत आहे.
पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार हे परिस्थिती सांभाळण्यासाठी पोलीस दलातील आपल्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र त्याठिकाणी असणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या थोबाडीत मारली, पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचं समजताच भाजपाचे नेते आणि काही कार्यकर्ते देखील तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी त्या भाजपा नेत्यांना पाहून प्रशांत कुमार यांनी हात जोडले. तसेच तुमच्याच लोकांनी थोबाडीत मारल्याचं देखील म्हटलं. पोलिसांना मारहाण केल्याचा हा व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
योगी जी का नारा था ठोंक दो,
— Manish Jagan Agrawal (मनीष जगन अग्रवाल) (@manishjagan) July 10, 2021
आज भाजपाइयों ने पुलिस को तबियत से ठोंका!
इटावा में भाजपा विधायक और जिलाध्यक्ष की मौजूदगी में भाजपा नेताओं ने एसपी सिटी को थप्पड़ मारा, पत्थरबाजी की,
पुलिस पिट रही है, सत्ताधारी गुंडों के आगे हाथ जोड़ रही है,
ये जंगलराज की परिभाषा नहीं तो और क्या है? pic.twitter.com/3j3TScSMR9
प्रशांत कुमार फोनवर वरिष्ठांशी बोलताना परिस्थितीची माहिती देत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. "हे लोक विटा आणि दगडफेक करत आहेत. त्यांनी मला थोबाडीतही मारली. त्यांनी त्यांच्यासोबत बॉम्बही आणले आहेत. हे लोक भाजपाचे कार्यकर्ते आहेत. यात भाजपा आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे" असं म्हटलं आहे. घटनास्थळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या पण काहीच फायदा झाला नाही. कारण लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"पोलिसांच्या वेशात इथे गुंड कायद्याचं रक्षण करताहेत", राबडी देवींचा योगी सरकारवर हल्लाबोल#UttarPradesh#YogiAdityanath#crime#RabriDevi#Politics#Policehttps://t.co/JY1DiU1vbapic.twitter.com/Kr7eiAkFyV
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2021
"उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस"
उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा भय़ंकर प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपा सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे. "उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस" अशा शब्दांत राबडी देवी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राबडी देवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट आणि काही फोटो शेअर केले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज आहे. कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसांच्या वेशात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत" असं राबडी देवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही"#RupaliChakankar#YogiAdityanath#UttarPradesh#YogiGovernment#Politicshttps://t.co/NLYst3GtCPpic.twitter.com/Hj65Qq7Jcg
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2021