धक्कादायक! सोशल मीडियावर तरुणाने व्हायरल केले अश्लील व्हिडिओ, विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 06:10 PM2022-12-26T18:10:27+5:302022-12-26T18:12:02+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तरुणीने अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तरुणीने अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ विद्यार्थीनीच्या गावच्या एका तरुणाने व्हायरल केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा तरुणाने त्या तरुणीची छेडछाड केली. नंतर त्या तरुणीचे अश्लील फोटो व्हिडिओ घेतले, आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. हे प्रकरण औरैया जिल्ह्यातील कुदारकोट परिसरातील आहे. तेथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बारावीत शिकत होती. गावातील तरुण तिला त्रास देत होता, तरुणाने आपल्या मुलीचा शारीरिक छळ करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले असता तरुणाचे वडील, आई व नातेवाईकांनी त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले.
रुग्णालयात डॉक्टरांनी विद्यार्थ्यीनीला मृत घोषित केले आहे. रविवारी रात्री मुलीने घराच्या वरच्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शेजाऱ्यांनी विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.
नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी कुदरकोट पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब नोंदवला. आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.