पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 21:46 IST2021-01-31T21:43:29+5:302021-01-31T21:46:38+5:30
Suicide : या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्व जण हादरले आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले.

पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
आठवीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सूरतमध्ये उघड झाली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीनं अचानक आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय का घेतला याची चर्चा सुरु झाली. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्व जण हादरले आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले.
गुजरातमधील सुरत शहरातील एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कुटुंब बिहारमधील छपरा या गावचा असल्याची माहिती आहे. हे कुटुंब बिहारमध्ये जाण्याची तयारी करत होते. दरम्यान, त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली. मुलीच्या घरातील कुणालाही या आत्महत्येचं नेमकं कारण माहिती नव्हतं.मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून सर्वांना धक्का बसला.
या मृत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झाली आहे. पोलिसांनी ही माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणाचा तपास आत्महत्या समजून करत होतो, मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत मुलीचे कोणी लैंगिक शोषण केले होते का? या प्रकरणाचाही तपास करणार आहोत, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी एम.बी. तडवी यांनी दिली आहे.