एकांतात सहज, नकळत सारे घडतेय; रिव्हेंज पॉर्न काय आहे? महाराष्ट्राच्या पोलिसांनीच केलेय सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:30 AM2024-03-28T10:30:51+5:302024-03-28T10:31:42+5:30

अनेकांच्या आयुष्यात वादळ निर्माण होत असून जुना पास्ट नवीन आयुष्य सुरु केलेल्यांना किंवा करू इच्छिनाऱ्यांचे आयुष्य बरबाद करत आहे. पोलिसांनी या रिव्हेंज पॉर्नबाबत तरुण, तरुणींना सावध केले आहे. 

Everything happens easily, unconsciously in solitude love sex romance; What is revenge porn? The police of Maharashtra have warned | एकांतात सहज, नकळत सारे घडतेय; रिव्हेंज पॉर्न काय आहे? महाराष्ट्राच्या पोलिसांनीच केलेय सावध

एकांतात सहज, नकळत सारे घडतेय; रिव्हेंज पॉर्न काय आहे? महाराष्ट्राच्या पोलिसांनीच केलेय सावध

सध्या रिव्हेंज पॉर्नच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एक्सचा बदला घेण्यासाठी अनेकजण हा मार्ग चोखाळू लागले आहेत. यामुळे अनेकांच्या आयुष्यात वादळ निर्माण होत असून जुना पास्ट नवीन आयुष्य सुरु केलेल्यांना किंवा करू इच्छिनाऱ्यांचे आयुष्य बरबाद करत आहे. पोलिसांनी या रिव्हेंज पॉर्नबाबत तरुण, तरुणींना सावध केले आहे. 

प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात, आपल्या जोडीदाराला नग्न फोटो, व्हिडीओ पाठवतात. मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा, जोडप्याचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडून याच व्हिडिओ, फोटोचा गैरवापर केला जात आहे, असा इशारा खामगावचे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी तरुण-तरुणींना दिला आहे.

बदल्याच्या या मानसिकतेतून आणि एकांतात सहज, नकळत केलेल्या गोष्टींतून रिव्हेंज पॉर्नने जन्म घेतल्याचे ते म्हणाले. खामगावात सध्या असेच काही व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. प्रेमभंग झालेल्यांसोबत ना राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी हे केले जात आहे. प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणयदृष्य, एकमेकांना पाठवलेले नग्न फोटो, सोबतचे  व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर किंवा सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. 

एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अशा मार्गाचा अवलंब करणे याला सायबरक्राईमच्या भाषेत म्हणतात ‘रिव्हेंज पॉर्न' असे म्हटले जाते. रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्याने सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून, खामगावात देखील असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतली जात आहे. लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील, असा इशारा खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे.
 

Web Title: Everything happens easily, unconsciously in solitude love sex romance; What is revenge porn? The police of Maharashtra have warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.