दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:04 PM2022-01-10T17:04:04+5:302022-01-10T17:05:23+5:30
Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या.
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये चार महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. येथे पतीसमोर पत्नीवर अत्याचार करण्यात आला. घटनेवेळी पीडित महिलेचा मुलगाही तिथे होता. नवरा विनवणी करत राहिला पण नराधमाने ऐकले नाही. मुलगा देखील आईला सोडण्याची विनवणी करत राहिला, पण आरोपीला काही फरक पडला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 4 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या. तसेच, गेल्या काही दिवसांपासून गुंटूर जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळक्याने घडवलेल्या चोरीच्या लागोपाठ घटनांमुळे पोलिसांची झोप उडवली होती.
सप्टेंबरमध्ये गुंटूरच्या मेडिकोंडूर पोलीस स्टेशन हद्दीतील पलाडुगु साइड रोडवरील सट्टानापल्ली येथील एका जोडप्यावर या टोळीने हल्ला केला होता. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपींनी आणखी दोन जोडप्यांना लक्ष्य केले.
गुंटूर जिल्हा पोलिसांनी सांगितले की, टोळीतील गुंडांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या टोळीने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबाला अडवून बेदम मारहाण केली. मुलासमोरच त्याने आईसोबत क्रूर कृत्य केले. पतीने विरोध केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.
घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि बोटांच्या ठशांच्या आधारे टोळीचा सदस्य कुरनूल जिल्ह्यातील पन्याम भागातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले असता हे लोक शेतात काम करणारे मजूर असल्याचा बहाणा करत असल्याचे समोर आले. गुंटूर ग्रामीणचे एसपी विशाल गुन्नी यांनी सांगितले की, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सध्या २ आरोपी फरार आहेत. आरोपींनी राज्यात ३० हून अधिक बलात्कार आणि लुटमार केल्याची कबुली दिली आहे.