Ex Girlfriend नं एकच कॉल केला अन् लग्नात नटलेला नवरदेव थेट तुरुंगात पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 03:36 PM2021-11-23T15:36:57+5:302021-11-23T15:37:53+5:30
राहुल कुमार मिश्रा याच्याविरोधात धनबाद ठाण्यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं तक्रार केली होती.
लग्नाचा आनंद, नवरा-नवरी थोड्याच वेळात विवाह बंधनात अडकणार. मंडप सजला. वऱ्हाडी मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण आणि अचानक नवऱ्याला मंडपातून थेट तुरुंगात जावं लागलं. तर तुम्हाला काय वाटेल? बिहारच्या खगडिया येथे घडलेल्या अशाच एका प्रकारानं सगळेच हैराण झाले आहेत. ज्याठिकाणी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू होती. नवरा-नवरी एकमेकांसोबत सात फेरे घेण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी नवरदेवाच्या कृत्यामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं.
बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील तेमथा गावातील ही घटना आहे. राहुल कुमार मिश्रा नावाचा तरुण घरातून लग्न करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी झारखंडच्या धनबाद येथून पोहचलेल्या पोलिसांनी या नवरदेवाला अटक केली आणि धनबादला घेऊन गेली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे कुणालाही काळी कळालं नाही. सर्वजण लग्नाच्या तयारीत असताना फिल्मी स्टोरीप्रमाणे पोलिसांनी नवरदेवाच्या मुसक्या आवळल्या.
काय आहे प्रकरण?
राहुल कुमार मिश्रा याच्याविरोधात धनबाद ठाण्यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं तक्रार केली होती. लग्नाचं आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला. एक्स गर्लफ्रेंडला राहुलचं लग्न खगडिया येथे होत असल्याचं कळालं. त्यानंतर तिने धनबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस टीम आरोपी नवरदेवाला वरात निघतानाच त्याला अटक करून घेऊन गेली.
या आरोपीची एक्स गर्लफ्रेंड एका शाळेतील शिक्षिका आहे. आरोपी शाळेत लिपिक पदावर काम करत होता. दोघांमध्ये अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघंही लग्न करणार होते. परंतु त्यानंतर कुठल्यातरी कारणानं आरोपीने तिच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सर्व वऱ्हाडी मंडळी सहरसा येथे रवाना होत होते. तेव्हा धनबाद पोलिसांनी एन्ट्री करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. स्थानिकांच्या मते, आरोपी मधुपेरा येथे राहणारा आहे. परंतु त्याने खगडियातील परबता येथून लग्न सहरसा येथे निश्चित केले होते. पोलीस अधिकारी संजय विश्वास म्हणाले की, दोघंही धनबाद येथे एका शाळेत काम करत होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांसोबत जगण्याची शपथ घेतली. आरोपीनं पीडित तरुणीला तिच्याशी लग्न करणार असल्याचं आश्वासन दिले. परंतु एकेदिवशी तो मधेपुराला पोहचला आणि त्याने मोबाईल बंद केला. त्या काळात घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं. आरोपी तरुणाने मोबाईल बंद केल्यानं पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली.