263 कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अडकली अभिनेत्री कृति वर्मा, आरोप वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 01:37 PM2023-02-10T13:37:39+5:302023-02-10T13:41:27+5:30
Crime News : रोडीज आणि बिग बॉस सीझन 12 सारख्या टीव्ही शोजमध्ये दिसलेली कृति वर्मावर आरोप आहे की, आयकर विभागाकडून टॅक्स रिफंड जारी करण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्या लोकांसोबत तिचे संबंध होते.
Crime News : इन्कम टॅक्स अधिकारी पद सोडून अभिनेत्री बनलेली कृति वर्मा(Kriti Varma) च्या विरोधात ईडीने 263 कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसची चौकशी सुरू केली आहे. रोडीज आणि बिग बॉस सीझन 12 सारख्या टीव्ही शोजमध्ये दिसलेली कृति वर्मावर आरोप आहे की, आयकर विभागाकडून टॅक्स रिफंड जारी करण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्या लोकांसोबत तिचे संबंध होते. आता ईडीने तिची चौकशी सुरू केली आहे.
गेल्यावर्षी सीबीआयने आयकर विभागाचे एक वरिष्ठ कर सहायक अधिकारी पनवेलचे भूषण अनंत पाटीलसहीत काही लोकांवर फसवणूक करून टॅक्स रिफंड जारी करण्यावरून केस दाखल केली होती.
दिल्लीत सीबीआयने याबाबत केस दाखल केली होती. मुख्य तानाजी मंडळ अधिकारी जेव्हा आयकर विभागात एक वरिष्ठ कर सहायक रूपात काम करत होता. त्याची पोहोच आरएसए टोकनपर्यंत होती. त्याच्याकडे बरीच आतील माहिती होती. त्याच आधारावर त्याने दुसऱ्या लोकांसोबत मिळून फसवणूक केली होती.
यात भूषण अनंत पाटीलच्या खात्याशी जुळलेल्या बॅंक खात्यासहीत अनेक दुसऱ्या बॅंक खात्यांमध्ये पैसे ट्रांसफर करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने तानाची मंडळ अधिकारी, भूषण अनंत पाटील, राजेश शांताराम शेट्टी आणि इतरांविरोधात आरोप पत्र दाखल केलं होतं. यात कृति वर्माचं नाव होतं.
अशात कृति वर्माने हरयाणाच्या गुरुग्राममध्ये एक संपत्ती विकली होती. जी 2021 मध्ये काळ्या पैशातून खरेदी करण्यात आली होती. त्याची किंमत तिने आपल्या बॅंक खात्यात जमा केली होती. त्यानंतर लगेच चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीतून समोर आलं की, कृतिच्या बॅंक खात्यात 1.18 कोटी रूपये होते. जे जमीन विकून मिळवले होते. त्यानंतर तिचं अकाऊंट बंद करण्यात आलं.
चौकशी दरम्यान समजलं की, कृतिने फसवणुकीच्या पैशाचा वापर लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी भागात जमीन खरेदी करणे, तसेच पनवेल आणि मुंबईत फ्लॅट घेणे व तीन लक्झरी कार खरेदी करण्यासाठी केला होता.