माजी मंत्र्यासह कुटुंबाला बेशुद्ध केले! नोकराने अख्खे घरदार लुटले, पंजाब पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:42 PM2023-09-18T16:42:35+5:302023-09-18T16:43:12+5:30

तीन महिन्यांपूर्वीच या नोकराला कामावर ठेवण्यात आले होते. लुटमारीसाठी त्याने काही साथीदारांना बोलविले होते.

Ex-minister with the family fainted! Servant robs entire household, Punjab Police shaken | माजी मंत्र्यासह कुटुंबाला बेशुद्ध केले! नोकराने अख्खे घरदार लुटले, पंजाब पोलीस हादरले

माजी मंत्र्यासह कुटुंबाला बेशुद्ध केले! नोकराने अख्खे घरदार लुटले, पंजाब पोलीस हादरले

googlenewsNext

आपची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अकाली दलाच्या काळात मंत्रीपद भूषविलेल्या माजी मंत्र्याला व त्याच्या कुटुंबाला बेशुद्ध करून नोकराने घर लुटून पलायन केले आहे. माजी मंत्र्यासोबतच असा प्रकार घडल्याने पंजाब पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. 

माजी मंत्री जगदीश सिंग गरचा यांच्या घरात ही घटना घडली आहे. नोकराने गरचा यांच्यासह त्यांची पत्नी, बहीण आणि एका मोलकरणीला रात्रीच्या जेवणातून गुंगी आणणारे औषध दिले. यामुळे सर्व बेशुद्ध झाले. यानंतर या नोकराने पैसे, दागिने सर्व लुटून पलायन केले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. माजी मंत्री जगदीश सिंग यांना बेशुद्धावस्थेतच लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पक्खोवाल रोडवर अचानक बऱ्याच वर्षांनी एवढा पोलीस फौजफाटा पाहून लोकांनाही धक्का बसला होता. नंतर त्यांना खरा प्रकार समजला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. 

तीन महिन्यांपूर्वीच या नोकराला कामावर ठेवण्यात आले होते. लुटमारीसाठी त्याने काही साथीदारांना बोलविले होते. माजी मंत्र्यांच्या घराचे रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे काही मजूर कामावर आले होते. हाक मारूनही कोणी दरवाजा न उघडल्याने ते वाट पाहत पायऱ्यांवरच बसले होते. माजी मंत्र्यांचा ड्रायव्हर जेव्हा आला तेव्हा त्यांनी त्याला हे सांगितले. यानंतर सारा प्रकार उघड झाला. खिडकी उघडी पाहून तो आत गेला असता चारही जण बेशुद्धावस्थेत आढळले होते.

Web Title: Ex-minister with the family fainted! Servant robs entire household, Punjab Police shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Punjabपंजाब