भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:23 PM2020-06-26T19:23:25+5:302020-06-26T19:27:03+5:30

१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे.

Excavation begins for PMAY's house on India-Pakistan border; Seeing the iron, the beneficiary broke out in a sweat | भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

Next
ठळक मुद्दे१९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानला कशी धूळ चारली याचा पुरावा अजूनही सीमेच्या खेड्यात सापडतात. सीमेवर असलेल्या बीजराड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठाडाउ गावात घराचा पाया खोदण्याचे काम चालू होते. तेव्हा अचानक दारूगोळा सापडल्याने कुटुंबात खळबळ उडाली.

राजस्थानच्या वाळवंटातील सीमा भागात १९६५ आणि १९७१ च्या लढाईनंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण होते, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर बर्‍याच वेळा सीमा ताब्यात घेण्यात आली होती. १९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे.


१९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानला कशी धूळ चारली याचा पुरावा अजूनही सीमेच्या खेड्यात सापडतात. जेव्हा लोक सीमेच्या खेड्यात घरकामासाठी खोदकाम करताना तेव्हा त्यांना जुने दारुगोळा सापडतात. अशाच एका घटनेत कामगारांनी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याच्या भारत-पाक सीमेच्या अवघ्या दोन किमी आधी मीठाडाउ गावात पंतप्रधान आवास योजनेसाठी(PMAY) घर खोदण्यास सुरुवात केली, तर घरात खोदताना मातीच्या हांडीत ५२ जिवंत काडतुसे सापडली.


बाडमेर जिल्ह्यातील चौहटन भागात जेव्हा घरमालकाने खोदण्यास सुरवात केली, तेव्हा तेथे धारदार लोखंडी वस्तू पाहिल्यावर मजुरांना घाम फुटला, परंतु त्यानंतर जेव्हा संपूर्ण उत्खनन केले गेले तेव्हा असे आढळले की, इथल्या काही ठिकाणी लष्कराच्या हालचालीही झाल्या आहेत.

वास्तविक, सीमेवर असलेल्या बीजराड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठाडाउ गावात घराचा पाया खोदण्याचे काम चालू होते. तेव्हा अचानक दारूगोळा सापडल्याने कुटुंबात खळबळ उडाली. घाईघाईने ते ठिकाण सोडत सर्वप्रथम हे कुटुंब तेथून दूर नेण्यात आले आणि त्यानंतर मीठाडाउ येथील रहिवासी मदन कुमार यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना दारुगोळ्याबद्दल माहिती दिली. या माहितीनंतर बीजराडचे एसएचओ कैलाश घटनास्थळी पोहोचले आणि उत्खननात सापडलेले काडतुसे जप्त केल्यावर बीएसएफलाही माहिती देण्यात आली.



याबाबतची माहिती पोलिस उपअधीक्षक कार्यालयामार्फत सैन्याला देण्यात येणार आहे. यानंतर सैन्याद्वारे सुरक्षा उपकरणांद्वारे हा दारुगोळा घटनास्थळावरून काढून टाकला जाईल. तोपर्यंत प्रशासनाने घरमालकाला खोदकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही याच काळात सीमा भागात उत्खननात सैन्याशी संबंधित वस्तू मिळाल्या होत्या. तज्ञांचा अशी शक्यता वर्तवली आहे की, १९६५ च्या युद्धाच्या वेळी हे गाव गोळीबारात जळाले होते. अनेकांना गाव सोडून चौहटनमध्ये यावे लागले. दरम्यान, गावच्या संरक्षणासाठी सरकारकडून गावकऱ्यांना शस्त्रेही देण्यात आली. हे कदाचित समान कारतूस असू शकतात.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

Sushant singh Rajput Suicide : ... तर मुंबई पोलिसांच्या जिवाला धोका; रुपा गांगुलीने व्यक्त केली शंका

Web Title: Excavation begins for PMAY's house on India-Pakistan border; Seeing the iron, the beneficiary broke out in a sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.