पायधुनी पोलिसांची उत्तम कामगिरी; बॅग चोरट्यांची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:16 PM2018-10-25T22:16:34+5:302018-10-25T22:16:52+5:30

या दुकानातील स्कूल, कॉलेज बॅग आणि सॅग अशा एकूण 580 बॅगा 10 गोण्यांमध्ये बांधून ठेवल्या व दुकानाचे शटर बंद करून गेले. रात्रीच्या वेळी पायधुनी परिसरात पोलिसांची गस्त असल्याने चोरटे दुसऱ्या दिवशी रविवारी सकळी 8 वाजताच्या सुमारास पुन्हा दुकानात आले व बॅगा भरलेल्या 10 गोण्या व 10 हजार रुपये रोकड घेऊन गेले. 

Excellent performance of Pidhuni police; Bag of thieves gang banged | पायधुनी पोलिसांची उत्तम कामगिरी; बॅग चोरट्यांची टोळी जेरबंद

पायधुनी पोलिसांची उत्तम कामगिरी; बॅग चोरट्यांची टोळी जेरबंद

Next

मुंबई - बॅगच्या दुकानाचे टाळे तोडून 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ही उत्तम कारवाई पायधुनी पोलिसांनी केली असून या टोळीतील चौघांना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्दुल रहमान इस्टेट येथे बॅगेचे दुकान आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी बॅगेच्या दुकानाचे टाळे तोडले. या दुकानातील स्कूल, कॉलेज बॅग आणि  सॅग अशा एकूण 580 बॅगा 10 गोण्यांमध्ये बांधून ठेवल्या व दुकानाचे शटर बंद करून गेले. रात्रीच्या वेळी पायधुनी परिसरात पोलिसांची गस्त असल्याने चोरटे दुसऱ्या दिवशी रविवारी सकळी 8 वाजताच्या सुमारास पुन्हा दुकानात आले व बॅगा भरलेल्या 10 गोण्या व 10 हजार रुपये रोकड घेऊन गेले. 

दरम्यान, सोमवारी या चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी 22 ऑक्टोबर 2018 रोजी मोहम्मद तारिक अब्दुल रहमान शेख (वय 24), मोहम्मद हारुन मुश्ताकअली शेख (वय 27), सुभानअली अब्दुल रहेमान शेख (वय 35), राजू रब्बुल शेख (वय 25) यांच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्यांकडून चोरीचा काही मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांना न्यायालयाने 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित चोरीचा मुद्देमालचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बॅग चोरट्यांच्या टोळीला परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह भोसले, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील,  पोलीस उपनिरीक्षक प्रवीण फडतरे, हवालदार सोलकर, ठाकूर आदी पोलीस पथकाने अटक करण्यात उत्तम कामगिरी केली.

Web Title: Excellent performance of Pidhuni police; Bag of thieves gang banged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.