मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:35 PM2020-06-30T14:35:25+5:302020-06-30T14:36:13+5:30

आयुक्तांची कारवाई : तो व्हीडीओ शहरातील हॉटेलमधीलच

Excise inspector suspended in jalgaon | मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित

मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्दे दहिवडे हे परमीट रुम व बियरबारची तपासणी करण्यासाठी गेले असता तेथे दप्तरावर नोंदी घेत असतानाच बियरचे घोट रिचवत होते. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे.

जळगाव : परमीट रुममधील कागदोपत्री रेकॉर्डची तपासणी करताना मद्याचे घोट रिचविणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक नरेंद्र दहिवडे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केली असून त्याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्राप्त झाले आहेत. या कारवाईबाबत उपायुक्त ए.एन.ओहोळ व अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दुजोरा दिला.

दहिवडे हे परमीट रुम व बियरबारची तपासणी करण्यासाठी गेले असता तेथे दप्तरावर नोंदी घेत असतानाच बियरचे घोट रिचवत होते. याबाबतचा व्हीडीओ दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ सोमवारी जळगावात आले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. जिल्ह्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अहवाल तयार करुन तो उपायुक्तांकडे सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे हा अहवाल पाठविला. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

व्हीडीओ २०१८ मधील
नरेंद्र दहिवडे यांचा ऑन ड्युटी मद्य प्राशन करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडीओ हा २०१८ या वर्षाचा असून तो शहरातील महामार्गावरील शिवकॉलनीजवळील एका हॉटेलमधला असल्याचे चौकशी निष्पन्न झाल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, याआधी नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स व आर.के.वाईन्समध्ये लॉकडाऊन काळातील मद्यविक्री प्रकरणातही दहिवडे यांच्यावर आरोप झाले होते. नशिराबाद येथील गोदामात तर जिल्हाधिकाऱ्यांनीच दहिवडे यांना फटकारले होते.

 

Web Title: Excise inspector suspended in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.