खळबळजनक! ठाण्यात पत्नीची हत्या करून रिक्षाचालक पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 10:03 PM2019-01-17T22:03:39+5:302019-01-17T22:10:18+5:30

वागळे इस्टेट परिसरातील घटना 

Excited! Thane's wife murdered; Autorickshaw driver committed suicide | खळबळजनक! ठाण्यात पत्नीची हत्या करून रिक्षाचालक पतीने केली आत्महत्या

खळबळजनक! ठाण्यात पत्नीची हत्या करून रिक्षाचालक पतीने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देहा प्रकार पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून झाला असल्याचे प्राथमिक तपास पुढील आल्याची माहिती श्रीरंग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एम.पाटील यांनी दिली.सुनील अर्जुन सांगळे (40) आणि अर्चना (35) असे मृत दाम्पत्याची नावे असून ते वागळे इस्टेट, जुना गाव, आयटीआय सर्कल, यादव निवास येथे भाडय़ाने राहत होते.

ठाणे - पत्नीची हत्या केल्यानंतर रिक्षाचालक पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. हा प्रकार पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून झाला असल्याचे प्राथमिक तपास पुढील आल्याची माहिती श्रीरंग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एम.पाटील यांनी दिली.

सुनील अर्जुन सांगळे (40) आणि अर्चना (35) असे मृत दाम्पत्याची नावे असून ते वागळे इस्टेट, जुना गाव, आयटीआय सर्कल, यादव निवास येथे भाडय़ाने राहत होते. मूळ नगर येथील रहिवासी असलेल्या सुनील आणि अर्चना यांचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एका साडेपाच वर्षाची मुलगी आहे.सुनील हा रिक्षाचालक असून अर्चना ही आयटीआयच्या सुरक्षा विभागात कामाला होती. सुनील हा अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू  होते.त्यातूनच, बुधवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. त्यातून त्याने तिची गळा आणि तोंड दाबून सुरूवातीला हत्या केली. तसेच गुरूवारी दुपारी त्याने नातेवाईकांना अर्चनाला मारल्याचे फोन करून सांगून त्यानंतर त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी मुलगी घरात होती. तसेच नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी घरा जाऊन पाहणी केल्यावर हा प्रकार जवळपास दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुढे आली. तर त्याने अंदाजे दोन वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली असावी. तसेच त्याच्या काही तास आदी त्याने अर्चना हिची हत्या केल्याची शक्यता आहे. तसेच त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Excited! Thane's wife murdered; Autorickshaw driver committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.