खळबळजनक! पैसे देण्यास नकार दिल्याने आईवडिलांच्या केली सिलेंडरने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 20:30 IST2022-03-27T20:29:58+5:302022-03-27T20:30:43+5:30
Double murder Case : आई-वडिलांनी पैसे देण्यास न दिल्याने एका मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलेंडरने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! पैसे देण्यास नकार दिल्याने आईवडिलांच्या केली सिलेंडरने मारहाण
बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांनी पैसे देण्यास न दिल्याने एका मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलेंडरने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. अजय साहनी असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटाही गावात राहणाऱ्या अजय साहनी याने काल रात्री झोपलेले वडील शंभू साहनी आणि आई शारदा देवी या दोघांचीही डोक्यात लहान गॅस सिलेंडरने हल्ला करून त्यांची हत्या केली. ही घटना त्याच्या लहान भावाच्या पत्नीने स्वतःच्या डोळ्याने पाहिली. आपल्याला कुणीतरी बघतय, हे कळल्यावर आरोपी अजय भावाच्या पत्नीलाही मारण्याकरीता धावला मात्र तिने घटनास्थळावरुन पलायन करून आपला जीव वाचवला.
१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या
आरोपी अजय फेब्रुवारी महिन्यात दिल्लीहून गावात आला होता. अजय हा नेहमी त्याचा आईवडिलांशी भांडत असे तसेच सतत पैशाची मागणी करायचा. अनेकदा त्याने आई वडिलांसह कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आईवडिल नेहमी त्याला पैसे देण्यास नकार देत. याच रागातून त्याने या हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.