मुंबई लोकलमध्ये सहप्रवासी महिलेला किस करणं पडलं महागात, तरुणाला कोर्टाने ठोठावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:21 PM2022-03-31T21:21:01+5:302022-03-31T21:21:38+5:30
Molestation Case : आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर किस घेणाऱ्या टवाळखोर तरुणाला अखेर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला एका वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 23 ऑगस्ट 2015 रोजी तक्रारदार महिला आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावर गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवास करत होती. त्यावेळी आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर किस करणाऱ्या आरोपीला जवळपास सात वर्षांनी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव किरण सुझा होनावर आहे. तो गोव्यातील पणजीचा रहिवासी आहे. या प्रकरणात जवळपास सात वर्ष कोर्टात खटला चालला. संबंधित सर्व साक्षीदारांची उलट तपासणी झाल्यानंतर किल्ला कोर्टाचे महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे.