ब्लास्टिंगकरीता स्फोटक पदार्थ वापरला; ११.२२ लाखांचा मुद्देमाल पकडला!

By संतोष वानखडे | Published: January 16, 2023 06:00 PM2023-01-16T18:00:07+5:302023-01-16T18:00:28+5:30

वाशिम : ब्लास्टिंगकरीता प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा ...

Explosives used for blasting; 11.22 lakh worth of goods caught in Washim | ब्लास्टिंगकरीता स्फोटक पदार्थ वापरला; ११.२२ लाखांचा मुद्देमाल पकडला!

ब्लास्टिंगकरीता स्फोटक पदार्थ वापरला; ११.२२ लाखांचा मुद्देमाल पकडला!

googlenewsNext

वाशिम : ब्लास्टिंगकरीता प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा लोणी बु. (ता.रिसोड) शेत शिवारातून ट्रॅक्टर, ड्रीलमशीनसह ११.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ज्वलनशील स्फोटक पदार्थांच्या वापरामुळे अनेकदा जीवित व वित्तहानी उद्भवते. त्यामुळे शासनाने ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक, विक्री व वापर करण्यावर प्रतिबंध घातला आहे. तरीही काही लोक छुप्या मार्गाने सदर स्फोटकांची साठवणूक, विक्री व वापर करीत असल्याचे समोर येत आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सर्व ठाणेदारांना निर्देश दिले आहेत. पे

ट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत लोणी बु. शेत शिवारातून प्रतिबंधित ज्वलनशील स्फोटक पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. लोणी बु., शेतशिवारातील एका शेतात एक ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर हा विनापरवाना ब्लास्टिंगकरिता वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ वापरत असल्याचे तसेच कोणत्याही प्रकारची काळजी न घेता मनुष्याच्या जीवित्वास व मालमत्तेस हानी पोहोचेल अशा स्थितीत आढळून आला.

Web Title: Explosives used for blasting; 11.22 lakh worth of goods caught in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.