कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात रिक्षात स्फोटके सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 01:59 PM2018-09-29T13:59:37+5:302018-09-29T14:01:20+5:30

पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु केला आणि तात्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आणि पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच त्यांना एका रिक्षात चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या.

 The explosives were found in the premises of the Kalyan police's Deputy Commissioner's office | कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात रिक्षात स्फोटके सापडली

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात रिक्षात स्फोटके सापडली

Next

कल्याण - कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यलयासमोर एका रिक्षात स्फोटके ठेवण्यात आल्याच्या निनावी चिठ्ठीमुळे काल कल्याण पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु केला आणि तात्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आणि पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच त्यांना एका रिक्षात चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. पोलीस उपायुक्त कार्यालयासह तीन महत्वाची शासकीय कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारात स्फोटके सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका इमारतीमध्ये तीन महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय, पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे. अशा महत्वाच्या इमारतीच्या आवारातच स्फोटके सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका रिक्षामध्ये अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावात राहणाऱ्या तीन शेतकरी महिला जमिनीच्या वादाप्रकरणी प्रांत कार्यलयात आल्या होत्या. या महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या त्याच रिक्षात स्फोटके आढळली आहेत. त्यामुळे तीन महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी ही स्फोटके रिक्षात ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी स्फोटके जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title:  The explosives were found in the premises of the Kalyan police's Deputy Commissioner's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.