५ हजार कोटींच्या तांदूळ खेचणाऱ्या धातूचं अमिष दाखवून घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 10:40 AM2019-12-30T10:40:49+5:302019-12-30T10:49:05+5:30

कॉपर इरेडियम  या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइटमध्ये करण्यात येतो

Exposing gangs of riot gangs exposing 8 thousand crores of rice | ५ हजार कोटींच्या तांदूळ खेचणाऱ्या धातूचं अमिष दाखवून घातला गंडा

५ हजार कोटींच्या तांदूळ खेचणाऱ्या धातूचं अमिष दाखवून घातला गंडा

googlenewsNext

कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइटमध्ये करण्यात येतो' असं  खोटं सांगून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी गजाआड केले आहे.  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे राईस पुलरच्या नावाखाली 3 जणांना जवळपास दीड कोटींना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक  केली आहे.  ताब्यात असणारे आरोपी  हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना फसवण्याचं काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
 

बोरिवली तसंच मुंबई उपनगरातील  परिसरात काही भामटे कॉपर इरेडियम या दुर्मिळ धातूचा वापर करून 'राईस पुलर'चे सर्वेक्षण करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट ११ ला प्राप्त झाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ३ लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इक्युपमेंट, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के, ओळखपत्रे, केमिकल्स बॉटल, मोबाईल फोन  हस्तगत केले आहेत.

ही भामट्यांची टोळी राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण शोध लावत असल्याचे भासवत  होते. कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइट, लाँच व्हेईकलमध्ये करण्यात येतो. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असं सांगून हे भांमटे लोकांना फसवत होते यासाठी या टोळीने International Venus Metal आणि Avon Metal Organisation  या बनावट कंपन्या स्थापन करून त्यांची वेबसाईट सुद्धा सुरू केली होती. 

 कॉपर इरेडियमने तांदळाचा एक तुकडा १ इंचावरून स्वतःकडे खेचल्यास त्याची किंमत प्रति नग 5 हजार कोटी मिळत असल्याचं आरोपी गुंतवणूक दारांना सांगत होते. कॉपर इरेडियममध्ये अल्फा बिटा, गामा सारखी किरणे उत्सर्जित आणि आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं त्याचं परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केले जाऊ शकतं. मात्र, आतापर्यंत टप्याटप्यात करण्यात आलेल्या संशोधनाला भारताच्या डीआरडीओ आणि सुरक्षा मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचं ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखवत आली होती.

 सदर गुन्ह्यातील  आरोपींनी मुंबई आणि उपनगरातील लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. यापैकी ३ आरोपींना पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यातून संशोधनात पैसा गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपये मिळतील असं आमिष ही टोळी दाखवत होती .संशोधन पूर्ण झाल्यावर अनेक कंपन्या हे कॉपर इरेडियम विकत घेतील आणि  त्यामाध्यामातून गुंतवणूकदारांना मोठा नफा होईल असे सांगून आरोपींनीं जाळ्यात ओढले. यात मोठं रॅकेट असून अनेक जण गुंतलेले असल्याची माहिती समोर येत आहे. या दिशेने पोलीसांची  तपास यंत्रणा कार्यरत आहे. अशा प्रकारे अजून कुणाला जर या टोळीने गंडा घातला असेल. तर त्यांनी मुंबई पोलीस गुन्हे शाखा ११ मध्ये संपर्क करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Web Title: Exposing gangs of riot gangs exposing 8 thousand crores of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.