नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:47 PM2020-01-01T22:47:34+5:302020-01-01T22:49:41+5:30

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कुख्यात राहुल ऊर्फ चिल लेपसेला तडीपारसह दोन साथीदारांसह अटक करून एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

Externee was found smuggling MD in Nagpur |  नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार

 नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार

googlenewsNext
ठळक मुद्देकुख्यात चिलसह तिघांना अटक : विद्यार्थ्यांना केले होते ग्राहक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कुख्यात राहुल ऊर्फ चिल लेपसेला तडीपारसह दोन साथीदारांसह अटक करून एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून ८७ हजाराची एमडी तसेच मोबाईल जप्त केले आहेत.
आरोपींची चौकशी केल्यास त्यांच्याकडून एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटची माहिती मिळू शकते. चिल लेपसेचा तडीपार साथीदार मृणाल मयुर गजभिये (२४) आनंदनगर, सीताबर्डी तसेच जिया खान ताज खान (२३) रा. भालदारपुरा, गंजीपेठ आहे. राहुल ऊर्फ चिल लेपसे बऱ्याच काळापासून एमडी तस्करी करतो. त्याला एकदा पकडण्यात आले होते. परंतु काही काळापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एनडीपीए सेलला मंगळवारी रात्री लेपसेचा साथीदार तडीपार मृणाल गजभिये ट्रॅव्हलने नागपुरात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अमरावती मार्गावर सापळा रचला. त्यांनी अमरावती मार्गावर मेहता कॉम्प्लेक्सजवळ मृणालला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५७ हजार रुपये किमतची १९ ग्रॅम एमडी तसेच मोबाईल मिळाला. पोलिसांनी मृणालला अटक करून चौकशी केली. त्याने लेपसे आणि जिया जवळ मोठ्या प्रमाणात एमडी असल्याचे सांगितले. त्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक करून ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम एमडी तसेच मोबाईल जप्त केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेपसेच्या इशाऱ्यावर मृणाल आणि जिया खान एमडीची विक्री करतात. लेपसे मुंबईच्या एका मोठ्या तस्कराकडून एमडी खरेदी करतो. आधी एमडी रेल्वेने नागपुरात आणण्यात येत असे. यामुळे पोलिसांनी रेल्वेने येणाऱ्या संशयितांवर नजर ठेवणे सुरू केले होते. पोलिसांनी अनेकदा त्यांना रेल्वेस्थानकावरून जाताना पकडले होते. यामुळे एमडी तस्कर आता ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत.

Web Title: Externee was found smuggling MD in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.