राहुल माटोडे व समीर जवंजाळविरूध्द खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:52 PM2024-06-19T23:52:49+5:302024-06-19T23:52:58+5:30

२५ हजार रुपये घेतल्याचा फिर्यादीचा आरोप : गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

Extortion case against Rahul Matode and Sameer Jawanjal | राहुल माटोडे व समीर जवंजाळविरूध्द खंडणीचा गुन्हा

राहुल माटोडे व समीर जवंजाळविरूध्द खंडणीचा गुन्हा

अमरावती: येथील एका मॉलमधील एजंट जॅक नामक बार सुरळित चालू ठेवण्याच्या मोबदल्यात खंडणी उकळल्याप्रकरणी युवा सेनेचे (ठाकरे गट) राहुल माटोडे व युवक कॉंग्रेसचे समीर जवंजाळ यांच्यासह महेश नामक अन्य एकाविरूध्द गाडगेनगर पोलिसांनी खंडणी उकळण्यासह मारहाण व शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. एजंट जॅकचे संचालक अनमोल अरोरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी एफआयआर नोंदविला. गाडगेनगरचे पोलीस निरिक्षक प्रशांत माने यांनी ही माहिती दिली. 

 माटोडे यांच्या धमकीला घाबरत आपण त्यांना ७ जून रोजी खंडणीची रक्कम म्हणून फोन पेद्वारे २५ हजार रुपये दिल्याचे अनमोल अरोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे. अरोरा हे भागीदारीत एजंट जॅक हा बार चालवतात. दरम्यान पुणे येथील पोर्शे अपघात घटनेनंतर अमरावतीमधील तथाकथित बार कम पबचा विषय एैरणीवर आला होता. शहरात पाचपेक्षा अधिक पब आहेत, ते बंद करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन देखील झाले होते. त्यापाश्वभूमिवर आपण पोलीस आयुक्तांना पत्र लिहून यापुुढे आपल्या बारमध्ये नाचगाणे होणार नाही, असे पत्र लिहून सांगितले होते. मात्र, यापुढे बार अथवा पब चालवायचा असेल तर माटोडे यांनी आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप अरोरा यांनी केला. दरम्यान, १६ जून रोजी अरोरा व माटोडे व इतरांमध्ये एका राजकीय महिलेच्या घरी बैठक झाली. त्यावेळी माटोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत आपल्याला बेदम मारहाण केल्याचे अरोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अरोरा यांच्या तक्रारीवरून माटोडे, जवंजाळ व महेश नामक इसमांसह तिघांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. अरोरा यांनी माटोडे यांच्या फोनपेवर २५ हजार रुपये पाठविल्याची तक्रारीत नमूद आहे. 
प्रशांत माने, पोलीस निरिक्षक, गाडगेनग

Web Title: Extortion case against Rahul Matode and Sameer Jawanjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.