शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई

By चैतन्य जोशी | Published: October 31, 2023 07:35 PM2023-10-31T19:35:03+5:302023-10-31T19:36:26+5:30

१.९७ लाखांची रक्कम रिकव्हर : संशयिताला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

Extortion of 2 lakhs without giving agricultural materials, arrest the accused | शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई

शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई

वर्धा : फेसबुकवरील शक्तीवान इंजिनीअरिंगची जाहीरात पाहून शेती अवजारे रोटावेटर व इतर शेती साहित्य खरेदीच्या नावावर तब्बल १ लाख ९७ हजार ६४० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यास गुजरात राज्यातील राजकोट येथून सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने त्यास ३ रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अक्षय नरेनभाई भिंबा (२३ रा. पारडी जि. राजकोट, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सचिन नारायण दानव रा. पवनार याला शेती साहित्य घ्यायचे असल्याने त्याने फेसबूकवर शक्तीवान इंजीनिअरींग ट्राॅली कंपनीची जाहीरात पाहिली त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करुन संपर्क साधला. सचिनने शहानिशा करुन रोटाव्हेटर, नागर, तीरी पंजी, व्ही-पास एक्का अशा १ लाख ९७ हजार ६४० रुपयांच्या वस्तूंचा ऑर्डर दिला. मात्र, साहित्य आले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने १२ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रीक तपासावरुन आरोपी गुजरात येथील राजकोट येथून गुन्हयाची सुत्रे हलवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने २७ ऑक्टोबर रोजी राजकोट गुजरात गाठून आरोपी अक्षयला बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक राहुल ईटेकार, कुलदीप टांकसाळे, सचीन सोनटक्के,रंजीत जाधव, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनूप राऊत, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, मिना कौरती, अक्षय राऊत, गोवींद मुंडे, विशाल मडावी, अमीत शुक्ला, अनूप कावळे, अंकित जिभे, प्रतिक वांदीले, स्मिता महाजन यांनी केली.

Web Title: Extortion of 2 lakhs without giving agricultural materials, arrest the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.