महिलेने प्रियकरासोबत मिळून केली पती आणि तीन मुलांची हत्या, मग जळून मेल्याचा रचला बनाव, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:16 PM2021-09-30T15:16:30+5:302021-09-30T15:19:18+5:30
Crime News: हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अग्निकांडाबाबत आता धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. मात्र आता हे सुनियोजित हत्याकांड होते. (Extramarital affair) आणि या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती आणि मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
चंबा (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अग्निकांडाबाबत आता धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. या अग्निकांडामध्ये वडील आणि तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र मुलांची आई वाचली होती. मात्र आता हे सुनियोजित हत्याकांड होते. आणि या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती आणि मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. सदर महिलेचे गावातील जमात अली नामक इसमासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकत्र राहू इच्छित होते. त्यातून त्यांनी हे भयानक कारस्थान रचले त्यांनी घराला आग लावली आणि त्यामध्ये तीन मुले आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजी चंबामधील चुराह उपमंडलामधील करातोह गावातील एका घरात आग लागून ३ मुलांसह पतीचा मृत्यू झाला होता. यामध्ये या मुलांची आई आश्चर्यकारकरीत्या वाचली होती. सर्वजन या दुर्घटनेला अपघात समजत होते. मात्र या महिलेने पती मोहम्मद रफी, मोठा मुलगा जैतून, दुसरा मुलगा समीर आणि मुलगी जुलेखा यांना अत्यंत चलाखीने ठार मारले होते.
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार विवाहापूर्वी जमात अली तरुण महिलेच्या प्रेमात पडला होता. तसेच त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. मात्र महिलेचा विवाह मोहम्मद रपी याच्याशी झाला. मात्र असे असले तरी जमात अली भुरावर प्रेम करत होता. तो तिच्याशी बोलण्यासाठी दोन-तीन वेळा गावातही आला होता.
दरम्यान, पोलीस तपासामध्ये दोघेही एकमेकांवर हत्येचा आरोप करत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आधी या सर्वांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली. पोलीस या हत्याकांडात कुऱ्हाड हे मोठे हत्यार असल्याचे गृहित धरून तपास करत आहेत. ही कुऱ्हाड फिंगर प्रिंट तपासण्यासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. तसेच तेथून रिपोर्ट आल्यावर फिंगर प्रिंट तपासून पाहिले जातील. तपासामध्ये सदर तरुण या महिलेला तिथून उठवून घेऊन गेला, त्यामुळे ती वाचल्याचेही सांगण्यात आले.
सदर महिलेचा पती आणि मुलांचा जळून मृत्यू झाला नसल्याचे पोस्टमार्टममधून समोर आले आहे. नंतर पोलिसांना सदर महिलेची कसून चौकशी केली असता तिने सारे काही कबूल केले. पोलिसांनी मृताच्या वडिलांचा जबाब नोंदवला असून, त्यानंतर मृताची पत्नी आणि जमात अली याला अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.