फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:09 PM2022-07-13T13:09:42+5:302022-07-13T13:10:01+5:30

Love Story: शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली.

Facebook boyfriend absconded after 6 days of marriage | फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

googlenewsNext

Love Story:  फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 वर्षाआधी बोलणं सुरू झालं होतं. पण एका कपलचा लग्नाचा प्रवास लग्नाच्या केवळ 6 दिवसांनंतरच संपला. ही घटना कानपूरच्या एका तरूणीसोबत घडली असून तिने न्यायासाठी पोलीस कमिश्नरकडे मागणी केली. तिने तक्रार दिली की, शैलेंद्र सिंह गौतम नावाच्या व्यक्तीसोबत 10 वर्षाच्या अफेअरनंतर एक जुलै  2022 ला लग्न झालं. शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती.

लग्नानंतर पती झाला फरार

अनेकदा दोघांची भेट झाली आणि 10 वर्षांच्या प्रेमानंतर 1 जुलै 2022 ला त्यांनी लग्न केलं आणि त्याच्या 6 दिवसांनंतरच शैलेंद्र सिंग गौतम फरार झाला. तरूणी त्याचा ठिकठिकाणी शोध घेत राहिली, पण तो काही सापडला नाही.  तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शैलेंद्रला 10 जुलैला शोधून काढलं. आता तरूणीने पोलिसात तक्रार दिली की, शैलेंद्र आणि त्याचा परिवार तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकत आहे. ते 25 लाख रूपये रोख आणि कारची डिमांड करत आहेत.

तरूणीने आरोप केला की, 10 वर्षाच्या नात्यादरम्यान शैलेंद्रने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. लग्नाचा तगादा लावल्यानंतर शैलेंद्रने रजिस्टर्ड मॅरेज आणि आर्य़ समाज मंदिरात लग्न केलं. ज्याच्या 6 दिवसांनंतर तो अचानक गायब झाला. तरूणीने सांगितलं की, तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Web Title: Facebook boyfriend absconded after 6 days of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.