भयंकर! फेसबुकवरच्या मैत्रीने केला घात; बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:27 PM2021-07-01T20:27:39+5:302021-07-01T20:32:37+5:30
Crime News : बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना देखील घडली आहे. फेसबुकवरच्या मैत्रीने घात केला आहे. बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. हरियाणाच्या सोनीपतमध्ये संतापजनक घटना घडली आहे. Facebook वर झालेल्या मित्राने वाढदिवसाच्या बहाण्याने बोलवलं आणि बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. तरुणी दिल्लीची रहिवासी आहे तर आरोपी हरियाणामधील सोनीपतचा रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या बहाण्याने तरुणीला सोनीपतमधील गीता भवन चौकातल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं. ती तिथे आल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने अनेकदा विरोध केला. मात्र आरोपीने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक! कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल; घटनेने खळबळ#Crime#Police#Suicidehttps://t.co/89p8o9xafO
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
प्रेमासाठी काय पण! अभ्यासासोबत गिरवले प्रेमाचे धडे अन्...#crime#Police#teacher#Studenthttps://t.co/S1ozvYXrg4
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2021
माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट
विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर (72 वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत एक योजना आखली.
नात्याला काळीमा! ...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; सत्य समोर आल्यावर पोलीसही झाले हैराण; असा झाला उलगडा#Crime#Police#deathhttps://t.co/h3zBaKk8JL
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2021