विविध अ‍ॅपचा अल्पवयीन मुलांभोवती फास; तापट स्वभाव घेतोय जीव..संवाद हरवतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 12:37 AM2019-01-16T00:37:28+5:302019-01-16T00:44:22+5:30

मुंबई  - टिक - टॉकवर अ‍ॅपवर व्हिडीओ टाकण्यास विरोध केला म्हणून १५ वर्षीय मुलीने स्वत:चे आयुष्य संपविल्याने सर्वानाच हेलावून ...

Faces around the various kids of different apps; Jealousy is going on | विविध अ‍ॅपचा अल्पवयीन मुलांभोवती फास; तापट स्वभाव घेतोय जीव..संवाद हरवतोय

विविध अ‍ॅपचा अल्पवयीन मुलांभोवती फास; तापट स्वभाव घेतोय जीव..संवाद हरवतोय

Next

मुंबई  - टिक - टॉकवर अ‍ॅपवर व्हिडीओ टाकण्यास विरोध केला म्हणून १५ वर्षीय मुलीने स्वत:चे आयुष्य संपविल्याने सर्वानाच हेलावून सोडले.  सोशल मिडीयाच्या वाढत्या जाळ्यात विविध अ‍ॅपचा तरुणाईभोवती वाढणारा फास हा चिंतेचा विषय ठरत आहेत. यामध्ये दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्याचे प्रमाण अधिक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. 
बदलत्या जीवनशैलीमुळे नाते दुरावत आहेत. संवाद कमी झाला आहे. कोवळ्या वयातच हातातील स्मार्ट फोनमुळे सोशल मिडीयाच्या जाळ्यात अल्पवयीन मुले भरकटताना दिसत आहेत. फसवणूकीबरोबरच विविध सायबर गुन्ह्यांत ही मुले सॉफ्ट टार्गेट ठरताहेत. 
अशात विविध अ‍ॅपनी डोकेवर काढले आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, यु ट्युब, या सोशल साईट्सह टिक-टॉक, माय फोटोज, लाईक व्हिडीओ, वी लाईक, टिंडर सारख्या अनेक अ‍ॅपला मुले पसंती देत आहेत. दिवसभरात नवनवीन कपडे बदलायचे, मेकअप करुन वेगवेगळे व्हीडिओ शेअर करण्याचे त्यांना जणू व्यसनच जडले आहेत. अनेकदा या फोटो, व्हिडिओचा ठग मंडळी फायदा उचलतात. 
भोईवाडा येथे आत्महत्या केलेल्या मुलीला देखील टीक - टॉकवर व्हिडीओ टाकण्याची सवय लागली होती. दिवसाला ५ ते ६ वेळा वेगवेगळे व्हिडीओ करुन ती पोस्ट करत असे. वडिलांच्या वाढदिवशीही ती प्रत्येक्ष क्षण व्हिडीओ बनून पोस्ट करत असल्याने आजीने हटकले.     व्हिडीओ बनविण्यास नकार दिला. याच रागात बाथरुममध्ये जाऊन तिने गळफास घेतला.
त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होत, त्यांना चूक- बरोबरची जाणीव करुन देणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. दिवसाला अशा स्वरुपाचे प्रकरणे घेवून पालकवर्ग मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेत असल्याचे डॉ. सागर मुंदडा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

परिस्थिती समजून घ्या...
पालकांनी सुरुवातीपासूनच मुलांच्या प्रत्येक सवयींवर लक्ष ठेवायला हवे.  मोबाईलच्या वापरावर निर्बंध आणावे. संवाद वाढवायला हवा. त्यांना प्रत्येक गोष्टींचा काय आणि कशासाठी उपयोग आहे? याची जाणीव करुन द्या. मुलांसाठी काही नियम वेळीच ठरवायला हवेत. ते नियम पालकांनाही लागू होतात. कारण पालकच त्यांचे आयडॉल असतात. आणि पाल्य त्यांचेच अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी त्याची काळजी घ्यायला हवी. पाल्यांसोबत संवाद वाढवा.

- उन्मेश जोशी, संचालक, रिस्पॉन्सिबल नेटिजम प्रोजेक्ट

म्हणून गाठतात टोकाचे पाऊल...
सोशल मिडीयावर तात्काळ मिळणाऱ्या प्रतिसादामुळे  अल्पवयीन मुले त्याकडे ओढली जातात. त्यात त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभर १० व्हीडिओ, फोटो टाकून त्याला लाईक्स मिळत नसेल तरे नैराश्येत जातात. आपल्या जगण्याला अर्थ नाही, मी सुंदर नाही, अशी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. ज्या गतीने त्यांना प्रतिसाद मिळतो, त्याच गतीने प्रतिसाद  न मिळाल्याने ते नैराश्येच्या गर्तेत जातात. सहनशक्ती, प्रतीक्षा करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मुलांची चिडचिड होते. स्वभाव तापट होतो. याच तापट स्वभावात ते टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे.  त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Faces around the various kids of different apps; Jealousy is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.