Fact Check : जागतिक पदकविजेत्या कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाची गोळ्या झाडून हत्या? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:53 PM2021-11-10T18:53:07+5:302021-11-10T19:38:54+5:30
Wrestler Nisha Dahiya Murder : हल्ल्यानंतर अज्ञात गुंड घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात निशा आणि तिचा भाऊ सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई धनपती यांना गंभीर अवस्थेत रोहतक पीजीआयमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोनीपत - हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी निशाचा भाऊ आणि आईलाही लक्ष्य केले. या हल्ल्यात निशासोबतच तिच्या भावाचाही मृत्यू झाला आहे. तर त्याच्या आईला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पण, या निशा दहियाच्या हत्येमुळे एक वेगळाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत निशा दहिया ( Nisha Dahiya) नावाच्या कुस्तीपटूनं कांस्यपदक जिंकले होते आणि आज हत्या झालेली निशा ही तिच पदकविजेती खेळाडू असल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी तर जागतिक स्पर्धेतील पदकविजेती निशाचीच हत्या झाली, असे वृत्त चालवले. जाणून घेऊया सत्य... (National-level wrestler Nisha Dahiya)
सोनीपतमधील हलालपूर गावात आज धक्कादायक घटना घडली. येथे कुस्तीपटू सुशील कुमारच्या नावाने एक अकादमीही आहे. येथेच हल्लेखोरांनी हा हल्ला केला. हल्लेखोरांनी निशा दहिया, तिचा भाऊ सूरज दहिया आणि आई धनपती यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. हल्ल्यानंतर अज्ञात गुंड घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात निशा आणि तिचा भाऊ सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई धनपती यांना गंभीर अवस्थेत रोहतक पीजीआयमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोनीपत पोलिसांनी निशा आणि सूरज यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. खरखोडा पोलिसांनी या हायप्रोफाईल दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पण, ही ती निशा दहिया नव्हे...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भुषण शरण सिंग यांनी हत्या झालेली कुस्तीपटू निशा ही जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारी निशा नाही, असे सांगितले. त्यांनी निशाचा व्हिडीओही पाठवला.
जागतिक स्पर्धेतील पदक विजेती कुस्तीपटू निशा दहियाच्या हत्येचे वृत्त चुकीचे...#WrestlerNishaDahiya#NishaDahiyapic.twitter.com/hw6ltpC6IC
— Lokmat (@lokmat) November 10, 2021