एका 'आधारकार्ड'वर १ हजार सिमकार्ड! पोलिसांनी असा केला बनावट 'सिमकार्ड गँग'चा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:01 PM2022-02-08T21:01:12+5:302022-02-08T21:01:52+5:30
कानपूरमध्ये चकेरी पोलीस आणि क्राइम ब्रँचला मोठं यश प्राप्त झालं आहे. पोलिसांनी ११ हजाराहून अधिक बनावट सिमकार्डचा वापर करुन अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
कानपूर
कानपूरमध्ये चकेरी पोलीस आणि क्राइम ब्रँचला मोठं यश प्राप्त झालं आहे. पोलिसांनी ११ हजाराहून अधिक बनावट सिमकार्डचा वापर करुन अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी ८०० हून अधिक बनावट आधारकार्डसह दोन जणांना अटक केली आहे. शानू खान नावाच्या एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या टोळीचा शोध लावला आहे.
क्राइम ब्रांचनं जेव्हा या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशीला सुरुवात केली तेव्हा एकाच आधारकार्डवर तब्बल दोन हजाराहून अधिक सिमकार्ड अॅक्टीव्ह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. वोडाफोन कंपनीचा डिस्ट्रीब्युटर अभिषेक मिश्रा आणि हर्षित मिश्रा यांनी लोकांच्या फोटोंचा गैरवापर करुन बनावट आधारकार्ड तयार केले होते, अशी माहिती क्राइम ब्रांचचे डीसीपी सलमान ताज पाटील यांनी सांगितलं. बनावट आधारकार्डचा वापर करुन आरोपी सिमकार्ड अॅक्टीव्ह करायचे आणि ते हव्या त्या किमतीला विकत होते. या सिमकार्डचा वापर गुन्हेगार विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी करत होते. ज्यांकडून विविध गुन्हे केले जात होते अशा दोघांकडून ८०० हून अधिक बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती सलमान ताज पाटील यांना दिली.