बॉयफ्रेंडचा खून, मग तुरुंगात सेक्सची मागणी...१८ वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या 'फेक बार्बी'च्या मागण्या तर पाहा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:21 PM2023-03-25T21:21:31+5:302023-03-25T21:22:01+5:30

आधी प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि आता तिनं जेलमध्येच एक विचित्र मागणी केली आहे.

Fake Barbie Punished For Boyfriend Murder Demanded Weird In Jail | बॉयफ्रेंडचा खून, मग तुरुंगात सेक्सची मागणी...१८ वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या 'फेक बार्बी'च्या मागण्या तर पाहा...!

बॉयफ्रेंडचा खून, मग तुरुंगात सेक्सची मागणी...१८ वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या 'फेक बार्बी'च्या मागण्या तर पाहा...!

googlenewsNext

आधी प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि आता तिनं जेलमध्येच एक विचित्र मागणी केली आहे. इंग्लंडच्या फुटबॉलपटूची हत्या करणारी इंग्लिश मॉडेल अबीगेल व्हाईट हिला गेल्या वर्षी १८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून ती इंग्लंडमधील तुरुंगात आहे. मात्र तुरुंगात या मॉडेलच्या विचित्र मागण्यांमुळे तुरुंग प्रशासन अडचणीत आलं आहे.

प्रियकराच्या हत्येनंतर तुरुंगात सेक्सची मागणी
फेक बार्बी म्हणून प्रसिद्ध असलेली ही मॉडेल इंग्लंडमधील २२ वर्षीय फुटबॉल खेळाडू ब्रॅडली लुईससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनाही तीन मुलं आहेत, मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये 'फेक बार्बी'नं किचनमधील ७ इंचाच्या चाकूनं प्रियकरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खरंतर लुईसला या मॉडेलपासून फारकत घ्यायची होती, पण अबीगेल यासाठी तयार नव्हती.

फेक बार्बीला सुनावली गेली १८ वर्षांची शिक्षा
अबीगेल व्हाईटविरोधात लुईसच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात अनेक महिने खटला चालला. चौकशी झाली. लुईसच्या कुटुंबीयांनीही अबीगेलवर हत्येचा संशय व्यक्त केला आणि अखेर न्यायालयाने लुईसला दोषी ठरवलं. अबीगेल म्हणाली की ती फक्त तिच्या प्रियकराला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती आणि चुकून त्याचा मृत्यू झाला. लुईसच्या हत्येप्रकरणी मॉडेलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून ती तुरुंगात आहे.

फेक बार्बीची आहे लाखोंची कमाई
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अबीगेल तुरुंगातूनही लाखो रुपये कमावते. ती ओन्ली फॅन्स या अॅडल्ट साइटवर तिचे फोटो अपलोड करते आणि तिथून ती लाखो रुपये कमावते. ओन्ली फॅन्स ही इंग्लंडची एक प्रसिद्ध वेबसाइट आहे ज्यामध्ये १८ वर्षांवरील लोकांची नोंदणी केली जाते. ओन्ली फॅन्समध्ये अबीगेलचे फोटो खूप प्रसिद्ध आहेत. २०२२ मध्ये या मॉडेलने तिच्या काही फोटोंमधून ५० लाखांपेक्षा जास्त कमाई केली होती.

तुरुंग प्रशासनाकडे केली विचित्र मागणी
पाच महिने तुरुंगवास भोगल्यानंतर आता ही 'फेक बार्बी' पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या मॉडेलने तुरुंग प्रशासनाकडे चक्क तुरुंगात सेक्सची मागणी केली आहे. सेक्स ही शारीरिक गरज असून ती तुरुंगातही पूर्ण व्हायला हवी, असं या मॉडेलचं म्हणणं आहे. कारागृहातील इतर अनेक मुलींशीही याबाबत बोलून त्यांचंही तिनं सहकार्य मागितलं आहे. आता या तुरुंगात बंद असलेल्या आणखी अनेक मुलीही 'फेक बार्बी'च्या समर्थनात पुढे आल्या आहेत.

रात्री कारागृहात स्त्री-पुरुषांना एकत्र ठेवावं
अबीगेलने म्हणाली की आता ती १८ वर्षांच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहे, तेव्हा महिला कैद्यांना त्यांच्या साथीदारांसोबत रात्र घालवण्याची परवानगी द्यावी, असे तिच्या मनात आले. कारागृहातच महिला व पुरुषांना रात्री एकत्र राहण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी पहिल्यांदाच समोर आल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. कैद्यांच्या कुटुंबीयांना दिवसा भेटण्याची मुभा असली तरी कारागृहात तशी सोय नाही.

Web Title: Fake Barbie Punished For Boyfriend Murder Demanded Weird In Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.