पत्नी म्हणून रुग्णालयात दुसरीलाच नेले; गर्भपातासाठी आलेल्या जोडप्याचे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:25 AM2020-02-13T05:25:02+5:302020-02-13T05:25:45+5:30

वडूजमध्ये खळबळ : पत्नी म्हणून रुग्णालयात नेले दुसरीलाच

A fake couple's came for an abortion | पत्नी म्हणून रुग्णालयात दुसरीलाच नेले; गर्भपातासाठी आलेल्या जोडप्याचे बिंग फुटले

पत्नी म्हणून रुग्णालयात दुसरीलाच नेले; गर्भपातासाठी आलेल्या जोडप्याचे बिंग फुटले

googlenewsNext

वडूज (जि. सातारा) : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर वडूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी बोगस जोडपे रुग्णालयात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूज येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले. संजय भांडवलकर (रा. पाचवड, ता. माण) याने त्याची पत्नी गर्भवती असून, ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्हाला सध्या अपत्य नको असल्याचे डॉ. वेदिका माने यांना सांगितले. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली असता तीन महिन्यांचा गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुसºया दिवशी बुधवारी रुग्णालयात येण्यास सांगितले.

दुपारी भांडवलकर दाम्पत्य रुग्णालयात पुन्हा आले. त्यांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्ष दिसण्यावरून व आधारकार्डवरील माहितीवरून यात तफावत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच डॉ. वेदिका माने यांचे पती डॉ. विवेकानंद माने हे संजय भांडवलकर यांचा मेव्हणा राजेश सुतार यांना ओळखतात. त्यामुळे साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

महिलेची प्रकृती बिघडली..
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघेही पती-पत्नी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करून भांडवलकरला अटक केली. तर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: A fake couple's came for an abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.