Fake Covid Report : बनावट कोव्हिड रिपोर्ट देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:09 PM2021-04-09T21:09:14+5:302021-04-09T21:09:34+5:30
Fake Covid Report : चारकोप पोलीस स्टेशन येथे ६ एप्रिलला चारू चौहान नावाच्या महिलेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक तक्रार दिली.
मुंबई: कोरोनाचा बनावट अहवाल देणाऱ्या लॅब टेक्निशियनला चारकोप पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार त्याने अद्याप ज्या रुग्णांचे स्वॅब गोळा केले. त्यांचे जबाब नोंदवत असल्याची माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी सांगितले.
चारकोप पोलीस स्टेशन येथे ६ एप्रिलला चारू चौहान नावाच्या महिलेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक तक्रार दिली. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा कोव्हीड अहवालात छेडछाड केली असावी असा या महिलेला संशय होता. त्यानुसार या महिलेने एक लेखी तक्रार चारकोप पोलिसांना दिली. त्यानुसार चारकोप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी तात्काळ या महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना तपास करता पाठवले. पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तपास केला असता एका नामांकित लॅब टेक्निशियन मोहम्मद सलीम मोहम्मद उमर याने या महिलेचा स्वॅब घेऊन अहवाल तयार करण्याकरता महिलेचे घेतलेले स्वॅब चाचणी करता पाठवल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात मोहम्मद सलीम मोहम्मद उमर याने महिलेचे स्वॅब चाचणी करता न पाठवता ऑनलाइन पद्धतीने कोव्हीडचे अहवाल डाऊनलोड करून त्यात छेडछाड केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं.