भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 04:04 PM2021-01-29T16:04:50+5:302021-01-29T16:07:53+5:30
Cyber Crime : अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसांत त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
अलीकडे बऱ्याच लोकांची फेक फेसबुक अकाउंट बनत असल्याचं निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचा सायबर क्राईम खूप वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक बड्या आयपीएस अधिकाऱ्यांना देखील या सायबर क्राईमला सामोरे जावे लागले. तसेच अनेक राजकीय व्यक्तींना देखील या सायबर क्राईमचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे मुलुंडचे भाजपा पक्षाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे देखील फेक फेसबुक प्रोफाईल बनविण्यात आले आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार दाखल केली आहे.
बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फसवणूक
रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट
मुलुंडचे भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधारे यांच्या नावाचे फेक फेसबुक अकाउंट बनवून अज्ञात व्यक्ती मेसेंजरवर पैशांची मागणी करीत आहे. याबाबत माहिती मिळताच गंगाधरे यांनी कृपया कोणीही एक दमडीही त्या व्यक्तीला ट्रान्सफर नये, नवीन फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारु नका, अशी विनंती केली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसांत त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
फेक फेसबुक अकाऊंटवरून प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपीला अटक