NCRBचा फुलफॉर्म सांगा बघू! एका प्रश्नामुळे भामटे अडकले; 'बोगस जज' अलगद सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:41 AM2022-04-05T11:41:57+5:302022-04-05T11:43:07+5:30

गेले जज म्हणून, परतले आरोपी बनून; NCRBच्या फुलफॉर्ममुळे चौघे फसले

fake flying squad caught during up board high school exam | NCRBचा फुलफॉर्म सांगा बघू! एका प्रश्नामुळे भामटे अडकले; 'बोगस जज' अलगद सापडले

NCRBचा फुलफॉर्म सांगा बघू! एका प्रश्नामुळे भामटे अडकले; 'बोगस जज' अलगद सापडले

Next

आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्र्यात बोगस जिल्हा दंडाधिकारी बनून फिरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघे बोलेरो कार घेऊन श्री माता वैष्णोदेवी इंटर कॉलेजमध्ये पोहोचले होते. त्यांच्या कारवर भारत सरकार जिल्हा दंडाधिकारी एनसीआरबी असा उल्लेख होता. सूटबूट घालून आलेल्या, स्वत:ला न्यायमूर्ती म्हणवणाऱ्या चौघांचा एका चुकीमुळे पर्दाफाश झाला.

सूटबूट घालून आलेल्या चौघांनी नेमप्लेट लावली होती. आपण दंडाधिकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितलं. मात्र ते त्यांना दाखवता आलं नाही. त्यामुळे संशय वाढला. त्यानंतर व्यवस्थापकांनी चौघांना एनसीआरबीचा फुलफॉर्म विचारला. मात्र त्यांना सांगता आला नाही. यानंतर व्यवस्थापकांनी डीआयओएस आणि पोलिसांना सूचना दिली. चौकशीत चोरट्यांचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या.

रघुवीर सिंह तोमर बोगस दंडाधिकारी टोळीचा म्होरक्या आहे. त्यानं कायद्याचा अभ्यास केला आहे. तर बाकीचे तिघे आठवी, बारावी पास आहेत. रघुवीरनं वसुलीसाठा टोळी तयार केली होती. परीक्षा केंद्रावर जाऊन प्रश्नपत्रिका तपासण्याच्या बहाण्यानं धमकावयाचा आणि त्यानंतर वसुली करायचा. एनसीआरबीमुळे चौघे पकडले गेले. चौघांपैकी एकालाही एनसीआरबीचा फुलफॉर्म सांगता आला नाही. 

शाळेवर छापा टाकण्याची योजना रघुवीरनं आखली होती. त्यासाठी नेम प्लेट तयार करण्यात आल्या. दहा हजारात कपडे शिवण्यात आले. एका खासगी शाळेत जाऊ. तिथे काही अनागोंदी आढळल्यास वसुली करू. त्यानंतर आणखी शाळांवर छापे टाकू, असं अन्य आरोपींनी पोलिसांना सांगितलं.

Web Title: fake flying squad caught during up board high school exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.