इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:56 PM2019-04-16T18:56:29+5:302019-04-16T18:58:21+5:30

ई -मेल आयडी बदलून इन्कम टॅक्स ऑफिसला खोटी माहिती देवून अडीच लाखांची फसवणूक केली आहे. 

fake information given to Income Tax office; Crime on one | इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा

इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा

Next

पिंपरी : ई - मेल आयडी बदलून इन्कम टॅक्स ऑफिसला खोटी माहिती देवून अडीच लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी कार्तिक बंडीपालन साई सुब्रमनियन (वय ३५, रा. ग्रीन सोसायटी, पद्मजी पेपर मिलसमोर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीने कार्तिक यांचा मेल आयडी व पॅनकार्डची माहिती घेतली. त्याआधारे त्यांच्या इन्कमटॅक्सच्या माहितीमधील मेल आयडी बदलून आरोपीने स्वत:चा मेल आयडी टाकला. त्यानंतर कार्तिक यांनी भरलेला इन्कम टॅक्स रिवाईज करुन त्यांच्या इन्कमबाबतची खोटी माहिती देवून कार्तिक व इन्कम टॅक्स ऑफिसची फसवणूक केली. तसेच रिफंडच्या नावाखाली २ लाख ५० हजार ३७० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०१६ ते ८ मार्च २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: fake information given to Income Tax office; Crime on one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.