आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 08:33 PM2020-01-22T20:33:52+5:302020-01-22T20:38:17+5:30

गुप्तवार्ता विभागाची कारवाई : सापळा रचत आरोपीला अटक

Fake IPS officer duped 70 lakh | आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख

Next
ठळक मुद्देया प्रकरणी पथकाने संतोष मिसाळला अटक केली आहे. मिसाळने आयपीएस अधिकारी संदीपकुमार मीना बोलत असल्याचे सांगून, मोहनलाल यांचे ५ किलो सोने परत करा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी भीती घातली.आयपीएस अधिकारी असल्याचे समजून राव यांनी तडजोडीअंती ७० लाख रुपये देण्यास तयारी दर्शवली.

मुंबई : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सोने व्यापाऱ्याकडून ७० लाख रुपये उकळल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी पथकाने संतोष मिसाळला अटक केली आहे.

मिसाळकडून सीबीआय अधिकारी आणि राज्य शासनाच्या मंत्र्याचे स्वीय सहायक असल्याची दोन ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोने व्यापारी हरीसिंग राव (४१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राव यांचा मुंबईसह देशभरातील सराफांना सोने विक्रीचा व्यवसाय आहे. राव यांची हैदराबादमधील मुसद्दीलाल ज्वेलर्सचे मालक मोहनलाल गुप्ता यांच्याशी ओळख आहे. याच दरम्यान २०१६ रोजी भारत सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर मोहनलाल यांचा लहान भाऊ कैलास यांच्या मुलांना ईडीने अटक केली. ही माहिती राव यांनाही समजली होती. काही दिवसांनी राव यांना एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. संबंधित व्यक्तीने ईडी कारवाईत मदत हवी असल्यास एक जण असल्याचे सांगितले. त्यानुसार, रावने मोहनलाल यांचा मोबाइल क्रमांक संबंधित व्यक्तीला दिला. काही दिवसांनी राव हैदराबादला गेल्यानंतर, संबंधित कॉलधारकाने भावाच्या मुलांची सुटका करून देण्यासाठी ५ किलो सोने देण्याचे ठरल्याचे राव यांना सांगितले. राव यांनी परस्पर निर्णय घ्या, असे सांगत ते निघून गेले.


काही दिवसांनी संबंधित कॉलधारकाने काम केले नसून सोने घेऊन गेला असल्याचे सांगताच राव यांना धक्का बसला. मोहनलालने राव यांना ते सोने परत करण्याची विनंती केली. मात्र संबंधित कॉलधारक ओळखीचा नसल्याचे सांगून राव यांनी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा फोन येणे सुरू केले. याच दरम्यान मिसाळने आयपीएस अधिकारी संदीपकुमार मीना बोलत असल्याचे सांगून, मोहनलाल यांचे ५ किलो सोने परत करा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी भीती घातली. संबंधित व्यक्ती आयपीएस अधिकारी असल्याचे समजून राव यांनी तडजोडीअंती ७० लाख रुपये देण्यास तयारी दर्शवली. मात्र त्यापूर्वी त्यांनी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागात धाव घेतली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून मिसाळला बेड्या ठोकल्या. चौकशीत तो अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्याला सोमवारी या गुन्ह्यात अटक करीत त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

Web Title: Fake IPS officer duped 70 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.