कोल्हापुरात १ लाख ८८ हजारांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 09:37 PM2022-08-27T21:37:43+5:302022-08-27T21:41:09+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी चिक्कोडी येथील एक तरुण बनावट नोटा देण्यासाठी महागावला येणार  असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

Fake notes worth 1 lakh 88 thousand seized in Kolhapur, three arrested in gadhinglaj by police | कोल्हापुरात १ लाख ८८ हजारांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

कोल्हापुरात १ लाख ८८ हजारांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Next

राम मगदूम

गडहिंग्लज : बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना गडहिंग्लज पोलीसांनी महागाव येथील पाच रस्ता चौकात शनिवारी दुपारी सापळा रचून अटक केली.अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५,रा. मेहबूबनगर, चिक्कोडी जि.बेळगाव), अनिकेत शंकर हुले (वय २०,रा.महागाव,ता. गडहिंग्लज) संजय आनंदा वडर (वय ३५,सध्या रा. शिक्षक कॉलनी, नेसरी मुळगाव महागाव ) अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून मोटरसायकलीसह १ लाख ८८ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
     
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी चिक्कोडी येथील एक तरुण बनावट नोटा देण्यासाठी महागावला येणार  असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी महागाव येथे  सापळा लावला होता. संशयित दोघेजण पाच रस्ता चौकात कांही अंतरावर रस्त्याच्या कडेला थांबले होते. दरम्यान, गडहिंग्लजकडुन मोटरसायकलवरुन ( केए २३-इ क्यू -९४८२)आलेला तरूणही 'त्या' दोघांजवळ जावून थांबला.त्यानंतर तिघांचीही हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी मोटरसायकल अडवून त्यांना ताब्यात घेतले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या. गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोळी, दादू खोत, दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 ५००,२००,१०० च्या नोटा!

अंगझडतीत अब्दुलरजाककडे   ५०० रुपयाच्या १३१ नोटा मिळून एकूण ६५५००,अनिकेतकडे २०० रुपयाच्या ३३५ नोटा मिळून ६७००० तर संजयकडे १०० रुपयाच्या ५६१ नोटा मिळून ५६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा पोलीसांना सापडल्या.

तिघेही मजूर,कोण सूत्रधार?

अब्दुलरजाक हा सेंट्रींगकाम करणारा, अनिकेत हा पेंटिंगकाम तर संजय गवंडीकाम करणारा मजूर आहे. झटपट श्रीमंतीच्या मोहापायीच ते याकडे वळले असण्याची शक्यता आहे.त्यामुळे या टोळीच्या खऱ्या सूत्रधारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

Web Title: Fake notes worth 1 lakh 88 thousand seized in Kolhapur, three arrested in gadhinglaj by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.