बनावट पीयूसी : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:35 PM2019-11-19T20:35:28+5:302019-11-19T20:38:38+5:30
प्रदूषण तपासणी यंत्र चालकाने त्याला ठरवून दिलेल्या हद्दीत प्रदूषण तपासणी यंत्र न लावता, दुसऱ्या हद्दीत तपासणी यंत्र लावून वाहनाचे बनावट पीयूसी प्रमाणपत्र देत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषण तपासणी यंत्र चालकाने त्याला ठरवून दिलेल्या हद्दीत प्रदूषण तपासणी यंत्र न लावता, दुसऱ्या हद्दीत तपासणी यंत्र लावून वाहनाचे बनावट पीयूसी प्रमाणपत्र देत होता. त्याची ही करतूद आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सुबोध पद्माकर देशपांडे (५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी प्रदूषण तपासणी यंत्र चालकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२०, ४६५, १९६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपी विशाल गोपाल हिरणवार रा. गवळीपुरा याच्याकडे प्रदूषण तपासणी यंत्र आहे. त्याला आरटीओने इतरत्र जागा दिली आहे. मात्र त्याने सीताबर्डी हद्दीतील गिरीपेठ येथे यंत्र लावून वाहनांना बनावट पीयूसी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.