भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 02:17 PM2023-07-27T14:17:35+5:302023-07-27T14:18:35+5:30

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते.

fake theft allegation raebareli police reach home daily collect 70 thousand rupees victim mother | भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका गावात पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. तीन दिवसांत 70 हजार रुपये परत करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप मुलीने केला आहे.

गदागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. गावामध्ये चोरीचा संशय महिलेच्या मुलावर घेतल्यानंतर पोलीस त्याच्यावर एफआयआर किंवा तपास न करता 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. पोलिसांनी तीन दिवसांत 70 हजार परत करण्यास भाग पाडल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या मुलीने केला आहे. यामुळे दुखावलेल्या आईने आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे.

लखनच्या घरात पाच दिवसांपूर्वी चोरी झाली होती. गावातील रहिवासी लखन याने त्याच ठिकाणी राहणाऱ्या शिवकुमार मौर्य यांच्या अल्पवयीन मुलावर आरोप केले होते. याप्रकरणी एफआयआर न नोंदवता पैसे परत करण्यासाठी पोलीस शिवकुमार मौर्य यांच्यावर दबाव आणत होते. पोलिसांच्या त्रासामुळे आणि समाजाच्या भीतीने दुखावलेल्या शिवकुमार मौर्य यांच्या पत्नी शांती देवी यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतल्याचा आरोप आहे.

गंभीर भाजलेल्या शांतीदेवी यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरात पोलीस रोज येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे आईला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, पुढील कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: fake theft allegation raebareli police reach home daily collect 70 thousand rupees victim mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.