तुम्हालाही अनोळखी व्हिडिओ कॉल्स येतात, तर व्हा सावध! अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 01:52 PM2022-08-25T13:52:07+5:302022-08-25T14:33:45+5:30

Cyber Crime : यापूर्वी केवळ सायबर गुन्हेगारांद्वारे हॅकिंग केले जात होते, मात्र आता त्यातही ब्लॅकमेलिंगचे  (Blackmailing) गुन्हे वाढत आहेत.

fake video call know how to avoid to unknown social media fake video call | तुम्हालाही अनोळखी व्हिडिओ कॉल्स येतात, तर व्हा सावध! अन्यथा...

तुम्हालाही अनोळखी व्हिडिओ कॉल्स येतात, तर व्हा सावध! अन्यथा...

Next

नवी दिल्ली :  जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला तर काळजी घेण्याची खूप गरज आहे. जर तुम्ही या प्रकरणात अडकलात तर तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. या प्रकारचे सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) सामान्यतः यूपी, हरियाणातील लोकांना त्यांच्या न्यूड कॉल स्कॅममध्ये अडकवतात. यापूर्वी केवळ सायबर गुन्हेगारांद्वारे हॅकिंग केले जात होते, मात्र आता त्यातही ब्लॅकमेलिंगचे (Blackmailing) गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून न्यूड कॉलचा घोटाळा करत आहेत.

न्यूड कॉल स्कॅम म्हणजे काय?
न्यूड कॉल स्कॅममध्ये गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून अज्ञात नंबरवरून व्हिडिओ कॉल करेल. तुम्ही हा फोन उचलल्यास, गुन्हेगार तुमचा फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करेल आणि नंतर तो मॉर्फ करेल. गुन्हेगार तुमच्या फोटोचे नग्न फोटो किंवा व्हिडीओमध्ये रूपांतर करेल आणि ते व्हायरल करण्याची धमकी देईल. या धमक्यांमध्ये तो तुमच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करेल. अनेक लोक नग्न फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप घाबरतात आणि बदनामी टाळण्यासाठी ते गुन्हेगारांचे बळी ठरतात. त्याचबरोबर ब्लॅकमेलरला आपल्या मागणीनुसार पैसे देण्यास भाग पाडले जाते. आपली इज्जत वाचवण्यासाठी लोक गुन्हेगारांना पैसे देतात.

सापळ्यात कसे अडकता?
तुम्हाला फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावरून मेसेज किंवा कॉल येईल. जर तुम्ही कॉल उचलला तर एक स्त्री तुमच्याशी बोलू लागेल. बोलत असताना तुमची मैत्री होईल, त्यानंतर ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल. तुम्ही देखील या व्हिडिओ कॉलमध्ये सामील व्हाल आणि या दरम्यान तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल. या व्हिडीओ कॉलसमोर तुम्ही एका सेकंदासाठीही आलात तर समोरची व्यक्ती तुमचा फोटो काढेल. यानंतर, तो तुमचा फोटो मॉर्फ करून आणि तुमचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करणारे फार कमी लोक आहेत. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे तुमच्यासोबतही घडू नये, त्यामुळे अनोळखी व्हिडिओ कॉलपासून सावध राहा आणि सुरक्षित राहा.

न्यूड कॉल स्कॅम कसा टाळायचा?
जर तुम्हाला न्यूड कॉल स्कॅम टाळायचा असेल तर पहिल्यांदा सोशल साइटवरील सर्व अकाऊंटमध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा मित्र बनवू नका. ज्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, त्याबद्दल तुम्ही कसून चौकशी करावी. जर तुम्ही त्याला ओळखत नसाल तर त्याला तुमचा मित्र बनवू नका. तरीही, तुम्ही नकळत त्यांना तुमचा मित्र बनवलात, त   री त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करू नका. चुकूनही त्यांचा व्हिडीओ तुम्हाला मिळाला तरी कॅमेरासमोर तुमचा चेहरा आणू नका, याद्वारे तुम्ही हा न्यूड कॉल स्कॅम टाळू शकता.

Web Title: fake video call know how to avoid to unknown social media fake video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.