उल्हासनगरात बिल्डर हरदास ठारवानी यांचे बनावट मृत्युपत्र, मुला विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:45 AM2022-06-05T00:45:26+5:302022-06-05T00:46:04+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१, न्यु टेलिफोन एक्सचेंज जवळील व्हिला रायल रेसिडेंसीमध्ये प्रसिद्ध बिल्डर हरदास हजरीमल थारवानी-८० हे कुटुंबासह राहतात. त्याना दोन मुले असून सुनील नावाचा मुलगा नवीमुंबई येथे राहतो.
उल्हासनगर- शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हरदास ठारवानी यांची मालमत्ता हडप करण्यासाठी मुलाने बनावट मृत्युपत्र बनविल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी हरदास ठारवानी यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलगा सुनील ठारवानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, न्यु टेलिफोन एक्सचेंज जवळील व्हिला रायल रेसिडेंसीमध्ये प्रसिद्ध बिल्डर हरदास हजरीमल थारवानी-८० हे कुटुंबासह राहतात. त्याना दोन मुले असून सुनील नावाचा मुलगा नवीमुंबई येथे राहतो. सुनिल थारवानी याने २०२१ मध्ये आपल्याच पित्याचे म्हणजे हरदास थारवानी यांचे बनावट मृत्युपत्र बनवून त्यावर पित्याच्या खोट्या सह्या केल्या. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने मृत्युपत्र बनवले आहे. दरम्यान सदर मृत्युपत्र हे खोटे असल्याचे माहीत असूनसुध्दा सुनिलने ते मृत्युपत्र न्यायालयात सादर करुन त्या मृत्युपत्राचा गैरवापर केला आहे. दरम्यान ही बाब हरदास थारवानी यांच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्का बसला. स्वतःच्या मुलाने मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने बनावट मृत्युपत्र बनविल्याने, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मुलगा सुनिल थारवानी याच्या विरुध्द तक्रार दाखल केल्यावर, पोलिसानी सुनिल यांच्यावर कलम ४२०, ४०६, ४६५ , ४६७ , ४६८ , ४७१ , ४७४ , प्रमाणे गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात चक्क पित्याचे बनावट मृत्युपत्र बनविणाऱ्या सुनील ठारवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस सुनील ठारवानी यांचा शोध घेत असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्याच मुलाने असा प्रकार केल्याने, सर्वत्र आचार्य व्यक्त होत आहे.