इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमात पडली अन् 2 मुलांची आई तरुणासोबत पळून गेली; पती म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:58 PM2023-02-27T12:58:53+5:302023-02-27T13:00:03+5:30

दोन मुलांच्या आईची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.  

falling in love with young man on instagram the mother of two children eloped with her lover | इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमात पडली अन् 2 मुलांची आई तरुणासोबत पळून गेली; पती म्हणतो...

इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमात पडली अन् 2 मुलांची आई तरुणासोबत पळून गेली; पती म्हणतो...

googlenewsNext

प्रेमासाठी लोक काहीही करतात असं म्हणतात. कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशा स्थितीत अनेकवेळा वाद पोलीस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचतात. अशीच एक धक्कादायक घटना झारखंडमध्ये समोर आली असून, ते प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. दोन मुलांच्या आईची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.  

प्रेमात पडलेली महिला नंतर प्रियकरासह पळून गेल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून, याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर महिला आणि तिचा प्रियकर हे पोलीस ठाण्यात आले. संबंधित महिलेचं 15 वर्षांपूर्वी रायरंगपूर येथील एका व्यक्तीशी लग्न झालं होतं. तर सहा महिन्यांपूर्वी ती तरुणाच्या प्रेमात पडली.

इन्स्टाग्रामवर महिलेची गालूडीहच्या पायरागुड़ी येथील रहिवासी गोपेश्वर भगतसोबत ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये बोलणे सुरू झाले, प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाण्याचा बेत आखला. यानंतर शुक्रवारी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिला आणि तिचा प्रियकर पोलीस ठाणे आले. तेथे दोघांचे नातेवाईकही हजर होते. पतीने पत्नीवर एक लाख रुपये रोख आणि दोन लाखांचे दागिने घेऊन फरार झाल्याचा आरोप केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: falling in love with young man on instagram the mother of two children eloped with her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.