रात्रीचं जेवण केल्यावर बेशुद्ध झाला परिवार, 2 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली सून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:38 AM2023-04-08T09:38:39+5:302023-04-08T09:38:54+5:30

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते.

Family fainted after dinner daughter in law ran away with lover in pilibhit | रात्रीचं जेवण केल्यावर बेशुद्ध झाला परिवार, 2 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली सून

रात्रीचं जेवण केल्यावर बेशुद्ध झाला परिवार, 2 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली सून

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने रात्री जेवणात नशेचा पदार्थ टाकला. नंतर हे जेवण पती, सासू आणि सासऱ्यांना खाऊ घातलं. ज्यामुळे ते सगळेच बेशुद्ध झाले. यानंतर महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. इतकंच नाही तर महिला दागिने आणि पैसेही घेऊन गेली. 

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना गुलाब टांडा गावातील आहे. इथे सुशील कुमार आपल्या परिवारासोबत राहतो. सुशीलने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितलं की, 6 एप्रिलच्या सायंकाळी घरातील सगळ्यांनी जेवण केलं, ज्यानंतर सगळेच बेशुद्ध झाले. जेवण त्याच्या पत्नीनेच तयार केलं होतं. तिनेच त्यात नशेचा पदार्थ टाकला होता.

जेवणानंतर परिवारातील सगळे लोक बेशुद्ध झाल्यावर त्याची पत्न 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. सुशीलने सांगितलं की, त्याला आधीपासूनच आपल्या पत्नीवर संशय होता की, तिचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. यावरून घरात अनेकदा वादही झाला आहे.
सुशीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून त्यांचा शोध घेणं सुरू केलं आहे. जेव्हा घराची झडती घेण्यात आली तेव्हा समजलं की, महिला तिच्यासोबत दागिने आणि घरातील पैसेही घेऊन गेली आहे. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. 

Web Title: Family fainted after dinner daughter in law ran away with lover in pilibhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.