धक्कादायक! IAS अधिकारी धर्मेंद्र सिंह यांना अटक; 1.10 कोटींची लाच घेऊनही केलं नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:17 AM2023-05-17T09:17:12+5:302023-05-17T09:18:09+5:30

सरकारी टेंडर देण्याच्या बदल्यात दिल्लीतील रहिवासी ललित मित्तल यांच्याकडून एक कोटी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

faridabad faridabad former commissioner ias dharmender singh arrested from gurugram residence | धक्कादायक! IAS अधिकारी धर्मेंद्र सिंह यांना अटक; 1.10 कोटींची लाच घेऊनही केलं नाही काम

फोटो - news18 hindi

googlenewsNext

हरियाणा सरकारने झिरो टॉलरेन्स नीतिवर काम करताना IAS अधिकारी धर्मेंद्र सिंह यांना अटक केली आहे. सरकारी टेंडर देण्याच्या बदल्यात दिल्लीतील रहिवासी ललित मित्तल यांच्याकडून एक कोटी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंत्राटदाराचे काम झाले नसताना त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्याने पैसे परत देण्यास नकार दिला. त्यानंतर फरिदाबाद पोलीस ठाण्यात कोतवालीमध्ये तक्रार देण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि माहिती गोळा केल्यानंतर रात्री उशिरा IAS धर्मेंद्र सिंह यांना त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानातून अटक केली, त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. आयएएस अधिकारी धर्मेंद्र सिंह हे फरिदाबाद महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. एसआयटीच्या पथकाने त्याला त्याच्या गुरुग्राम येथील घरातून अटक केली. 

कंत्राट मिळालच नाही

धर्मेंद्र सिंह यांनी सोनीपत महापालिका आयुक्तांसह हरियाणा भवनचे अतिरिक्त निवासी आयुक्तपदही भूषवले आहे. नवी दिल्लीचे रहिवासी मेसर्स हरचंद दास गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ललित मित्तल यांनी जून 2022 मध्ये फरीदाबाद कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 1.11 कोटी रुपये हडपल्याबद्दल एफआयआर दाखल केली. ललित मित्तल यांना कोणत्याही प्रकारचे कंत्राट मिळाले नाही, म्हणून त्यांनी तक्रार केली.

200 कोटींचा घोटाळा 

विशेष म्हणजे फरिदाबाद महापालिकेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मुख्य अभियंता, एक कंत्राटदार आणि इतरांनाही अटक केली आहे. महापालिकेच्या माजी आयुक्तांची चौकशी सुरू आहे. सध्या 3 आयएएस अधिकारी तपास पथकाच्या रडारवर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: faridabad faridabad former commissioner ias dharmender singh arrested from gurugram residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.