कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी फोडलं एटीएम, पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:43 PM2018-11-15T17:43:06+5:302018-11-15T17:43:34+5:30

गुजरातमधील सुरतमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना या दोघांना अटक केली आहे.

Farmers shot at ATM, police arrested for repaying loans | कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी फोडलं एटीएम, पोलिसांनी केली अटक 

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी फोडलं एटीएम, पोलिसांनी केली अटक 

Next

अहमदाबाद : गुजरातमधील सुरतमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण अल्पवयीन आहे. या दोघांनी 10 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना गोडादरा येथील आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर सोसायटीमध्ये राहणारा प्रकाश धमैया नावाचा एक व्यक्ती मंगळवारी पहाटे एका अल्पवयीन तरुणासोबत गोडादरा येथील एसबीआयचे एटीएम फोडण्यासाठी गेला. त्यावेळी एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक तैनात नव्हता. दोघेही एटीएमच्या आत गेले आणि एटीएमचे शटर बंद करुन घेतले. त्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आणि त्यांनी एटीएम फोडण्यास सुरूवात केली. मात्र, त्याचवेळी तेथून पेट्रोलिंगसाठी निघालेले पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी एटीएमजवळ येऊन पाहिले आणि त्या दोघांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, अटक करण्यात आलेले दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांचीही स्वतःची जमीन आहे. मात्र, प्रकाशच्या वडिलांना टीबीसह अन्य आजार आहेत. त्यांच्या उपचारासाठी 10 लाखांहून जास्त रक्कम खर्च झाली. त्यासाठी प्रकाशने स्वतःची जमिन नातेवाईकाकडे गहाण टाकून कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याला फेडायचे होते.
 

Web Title: Farmers shot at ATM, police arrested for repaying loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.