नक्षलग्रस्त भागातून सुरु होती कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:14 PM2021-07-06T20:14:47+5:302021-07-06T20:15:55+5:30

Fraud Case : सिल्पा कंपनीच्या नावाने २१० जणांची फसवणूक, ६ जणांवर कारवाई

The farud with the relatives of the Corona victims started from the Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागातून सुरु होती कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची फसवणूक

नक्षलग्रस्त भागातून सुरु होती कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देधनंजय उर्फ रामबरण पंडित (२०), शरवण उर्फ कौशल पासवान (२९), धर्मजय कुमार उर्फ कारू प्रसाद (२९), नितीश कुमार उर्फ मिथिलेश प्रसाद (२७), सुमंत कुमार उर्फ शत्रुघ्न प्रसाद (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कायम असताना बिहार मधील कत्रीसराय, बिहार शरीफ, तसेच वारसलिंगज या नक्षलग्रस्त भागातून कोरोना बाधित  रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांचे कॉल सेंटर उद्ध्वस्त करून ५ जणांना अटक करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी उच्चशिक्षित असून त्यात बीई, बीटेक झालेल्यांचा समावेश आहे. या टोळीने आता पर्यंत २१० जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले. हा आकड़ा जास्त असून, त्यानुसार अधिक तपास सुरु आहे.

धनंजय उर्फ रामबरण पंडित (२०), शरवण उर्फ कौशल पासवान (२९), धर्मजय कुमार उर्फ कारू प्रसाद (२९), नितीश कुमार उर्फ मिथिलेश प्रसाद (२७), सुमंत कुमार उर्फ शत्रुघ्न प्रसाद (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहेत.  तर संतोष कुमार, सूरज कुमार आणि सुरज कुमार उर्फ गोलू याचा शोध सुरु आहे. यात पंडित आणि पासवान 

              

गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिलेल्या  माहितीनुसार, कांदीवलीत राहणारे डॉक्टर अबासो चव्हाण (४२) यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. अशात सोशल मिडियावर सिप्ला कंपनीच्या नावाने असलेल्या जाहिरातीत इंजेक्शन उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधून इंजेक्शनची मागणी केली. तसेच ठगाने सांगितलेल्या क्रमांकावर पैसेही पाठवले. मात्र पैसे पाठवूनही इंजेक्शन न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर दुसरीकडे सिप्ला कंपनीच्या नावाने देशभरात अशा प्रकारे  शेकडो जणांची फसवणूक झाल्याचे मेल कंपनीला धडकले. कंपनीकड़ूनही पोलिसात तक्रार दिली. त्याबाबतही गुन्हा नोंद आहे.

           

याच आधारे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात, सिल्पा कंपनीच्या नावाने ट्वीटर अकाउण्ट बनावट खाते तयार करून त्याखाली वेगवगेळ्या बँक खात्यासह मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आल्याचे दिसून आले. तशीच ही मंडळी रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब औषध, ऑक्सिजन, प्लाझ्मा मिळवून देण्याच्या नावाखाली असलेल्या जाहिरातीना बळी पडलेल्या नागरिकांकड़ून पैसे उकळत होते. कत्रीसराय, बिहार शरीफ, तसेच वारसलिंगज या नक्षलग्रस्त भागातून ही टोळी काम करत असल्याची माहिती मिळताच पथक बिहारला रवाना झाले. शरीफ या भागात असलेले कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. तसेच वारसलिंगज येथून मुख्य आरोपीसह पाच जणांना बेडया ठोकल्या. तसेच अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपीकड़ून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे उच्च शिक्षित असून  यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स च्या नावाचा वापर करून कर्जपुरवठा करण्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. लॉकडऊन च्या काळामध्ये बजाज फायनान्सच्या नावाने फायदा होत नसल्याने त्यांनी कोरोना उपचाराकरता लागणाऱ्या सुविधा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक सुरु केल्याचे चौकशीत समोर आले. 

 ठग तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज 

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याच्या वृत्तातून ही मंडळी तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज होते. लहान मुलांसाठी लागणाऱ्या उपचाराच्या बहाण्याने त्यांनी बनावट ट्वीटर खाते तयार केले होते. 

ठगांच्या मोबाईल क्रमांकावर १० ते १५ हजार कॉल

सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात समोर आलेल्या माहितीत आरोपीनी प्रसारित केलेल्या वेगवगेळ्या मोबाईल क्रमांकावर  सुमारे दहा ते पंधरा हजार फोन कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच १०० सिमकार्ड जप्त करण्यात आले असून हे सिमकार्ड  पश्चिम बंगाल येथून पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई, दिल्ली, पुणे, जयपुर हैद्राबाद टार्गेट

 आरोपी हे ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून लोकांना एक ऑक्सिजन बेड मिळवून देण्याकरता सिप्ला कंपनीच्या नावाने जाहिरात प्रसारित करून त्यामध्ये संपर्क करता मोबाईल नंबर टाकून, दिल्ली मुंबई पुणे जयपुर हैदराबाद इत्यादी ठिकाणी ऑक्सीजन बेड उपलब्ध असल्याचे नमूद करत होते. अशात संपर्क साधून पैसे भरल्यानंतर आरोपी मोबाईल बंद करत होते. 

बनावट कागदपत्रांच्या आधारे उघड़ली ३२ बँक खाती

आरोपीनी बनावट बनावट पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर  करत ३२  बँक खाते उघडल्याचे समोर आले. या मंडळीनी आता पर्यंत या ठगीतून ६० लाखांची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: The farud with the relatives of the Corona victims started from the Naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.