उल्हासनगरात एकावर जीवघेणा हल्ला, हाताचा पंजा छाटला
By सदानंद नाईक | Updated: May 9, 2024 21:00 IST2024-05-09T21:00:50+5:302024-05-09T21:00:58+5:30
जगताप यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

उल्हासनगरात एकावर जीवघेणा हल्ला, हाताचा पंजा छाटला
उल्हासनगर : कॅम्प नं-५, गाऊन मार्केट येथिल दुकानदार चंद्रकांत जगताप यांच्यावर गुरवारी दुपारी तलवारीने जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यात एका हाताचा पंजा छाटला गेला असून दुसऱ्या हाताच्या पंजाचे बोट तुटले आहे. जगताप यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, गाऊन मार्केट मध्ये चंद्रकांत जगताप यांचे दुकान असून दुकानात असताना गुरवारी दुपारी जुन्या रागातून मोहन गायकवाड नावाच्या इसमाने तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जगताप यांच्या हाताचा एक पंजा छाटला गेला असून दुसऱ्या पंजाचे एक बोट तुटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गंभीर जखमी असलेल्या जगताप याला सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात तर तेथून मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्ल्या प्रकरणी संशयित आरोपी मोहन गायकवाड याला ताब्यात घेतल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी पी जगताप यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.