ना कुणी घरात येऊ शकतं...ना जाऊ शकतं; मग कुणी केली व्यापाऱ्याची हत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:15 IST2023-01-30T15:14:08+5:302023-01-30T15:15:12+5:30
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धारदार हत्यारानं व्यापाऱ्याची हत्या प्रकरणानं एकच खळबळ उढाली आहे.

ना कुणी घरात येऊ शकतं...ना जाऊ शकतं; मग कुणी केली व्यापाऱ्याची हत्या?
फतेहपूर-
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धारदार हत्यारानं व्यापाऱ्याची हत्या प्रकरणानं एकच खळबळ उढाली आहे. व्यापाऱ्याची त्याच्या राहत्या घरातच हत्या केली गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमनं देखील तपास केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही घटना बिंदकी कोतवाली हद्दीतील आहे.
एसपी राजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय अमित गुप्ता यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली. गुप्ता यांच्या डोक्यावर आणि मानेवर जखम आढळून आली आहे. मृतक मुंबईत धागा बनवण्याचं काम आणि मिड-डे मीलचा पुरवठा करण्याचं काम करत होता. तो एका आठवड्याआधीच आपल्या राहत्या घरी आला होता. दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी आणि मुलं देखील महाराष्ट्रातून येणार होते.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार घरात आत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पती आणि पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे या हत्याकांडात मृतकाच्या पत्नीवर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या मृतकाच्या आईच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.