धक्कादायक! सूनेची डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तांत्रिकांना बोलवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 11:16 AM2021-06-03T11:16:13+5:302021-06-03T11:18:28+5:30
ही घटना बिंदकी गावातील आहे. महिलेसोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या भावाला लागली तर तो तिच्या घरी गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. इथे एका महिला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने एका तांत्रिकाकडे गेली. तिच्यावर उपचार करण्याच्या नावावर त्यांनी महिलेसोबत जे केलं ते वाचून नक्कीच अंगावर शहारे येतील. महिलेवर उपचार करण्याच्या नावावर तिच्या शरीरावर या तांत्रिकांनी गरम चिमट्याचे चटके दिले. त्यासोबतच रात्रभर तिला मारहाण करण्यात आली. असे सांगितले जात आहे की, महिलेच्या सासऱ्यांनी तांत्रिकांना घरी बोलवलं होतं.
ही घटना बिंदकी गावातील आहे. महिलेसोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या भावाला लागली तर तो तिच्या घरी गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सोबतच या प्रकरणाची पोलिसात तक्रारही दिली.
मीडिया रिपोर्टनुसार रोटी गावात राहणारी महिला अनीता देवीचं वय ३० वर्षे आहे. काही दिवसांपासून तिला डोकेदुखीचा त्रास होत होता. डोकेदुखी थांबतच नव्हती. अशात तिच्या सासऱ्यांनी ठरवलं की, तिच्यावर काळ्या जादूने उपचार करू आणि मंगळवारी सायंकाळी त्यांनी दोन तांत्रिकांना घरी बोलवलं. (हे पण वाचा : इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल)
अनीता बेशुद्ध होती, तांत्रिक गेले होते...
घरातील लोकांचा आरोप आहे की, तांत्रिकांनी उपचाराचं नाटक करत अनीता देवीच्या हात-पायांना गरम चिमट्यांनी चटके दिले आणि रात्रभर तिला मारहाण केली. सकाळी होईपर्यंत अनीता बेशुद्ध पडली होती. ज्यानंतर तांत्रिक तेथून पसार झाले. कुटुंबीयांनी सांगितलं की, गरम चिमट्यांच्या जखमा तिच्या हात आणि पायांवर आहेत. (हे पण वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश)
सासऱ्याला अटक
बुधवारी सकाळी या घटनेची माहिती अनीताचा भाऊ जयनारायण याला लागली. तो घाईघाईने बहिणीच्या घरी पोहोचला. जयनारायण महिलेच्या सासऱ्यावर नाराज झाला आणि अनीताला जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याने दाखल केलं. यानंतर तिच्या सासऱ्या आणि तांत्रिकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे आणि दोन्ही तांत्रिकांची चौकशी केली जात आहे.