एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:10 PM2019-09-05T17:10:34+5:302019-09-05T17:12:24+5:30
विशेष कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर
नवी दिल्ली - एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी विशेष कोर्टाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या खटल्यामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने गुरुवारी एअरसेल-मॅक्सीस प्रकरणात चिदंबरम पिता - पुत्रांना अटकपूर्व जामीन दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत आहेत.
Delhi: Special Court grants anticipatory bail to P. Chidambaram and his son Karti Chidambaram in both ED and CBI cases in Aircel-Maxis matter. P Chidambaram is already in CBI custody in connection with INX media case. pic.twitter.com/hSw4FR6qL3
— ANI (@ANI) September 5, 2019